व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांची NSE ला ऐतिहासिक भेट; भारत-व्हिएतनाम व्यापारात नवी क्रांती!

मुंबई: व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी आपल्या भारत दौऱ्यादरम्यान मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या मुख्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रतिष्ठित ‘एनएसई बेल’ वाजवून भारतीय भांडवली बाजाराचे आणि अर्थव्यवस्थेचे कौतुक केले. या ऐतिहासिक भेटीमुळे दोन्ही देशांमधील आर्थिक आणि व्यापारी संबंधांना अधिक बळकटी मिळणार आहे.

या प्रसंगी एनएसईचे अध्यक्ष श्रीनिवास इंजेटी यांनी राष्ट्राध्यक्ष तो लाम आणि त्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे जंगी स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात इंजेटी यांनी नमूद केले की, “राष्ट्राध्यक्ष तो लाम यांची ही पहिलीच अधिकृत भारत भेट आहे. त्यांनी भारतीय वित्तीय क्षेत्राशी संवाद साधण्यासाठी एनएसईची निवड करणे, हे या भेटीचे विशेष महत्त्व अधोरेखित करते.”

आर्थिक प्रगती आणि द्विपक्षीय व्यापार

भारत आणि व्हिएतनाम हे दोन्ही देश सध्या उत्पादन (Manufacturing), तंत्रज्ञान आणि भांडवली बाजार क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहेत. या सहकार्यातूनच भारत-व्हिएतनाम मैत्रीचे नवे पर्व! महाराष्ट्रात ६.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

सध्या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार १६ अब्ज डॉलरच्या वर पोहोचला आहे. मात्र, हा टप्पा येथेच थांबणारा नसून २०३० पर्यंत हा व्यापार २५ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीचा दाखला देताना इंजेटी यांनी सांगितले की, फेब्रुवारी २०२४ मध्ये भारतातील एका प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतर अवघ्या १८ महिन्यांत पहिले वाहन उत्पादित झाले, जे दोन्ही देशांमधील वाढत्या कार्यक्षमतेचे प्रतीक आहे.

ट्रेडिंग ऑपरेशन्सची पाहणी

मुख्य कार्यक्रमानंतर राष्ट्राध्यक्ष तो लाम आणि त्यांच्या शिष्टमंडळाने नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अत्याधुनिक ट्रेडिंग आणि ऑपरेशन्स सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी भारतीय शेअर बाजारातील व्यवहार कसे चालतात आणि तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे केला जातो, याची सविस्तर माहिती घेतली. या भेटीनंतर व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा मुंबई दौरा संपन्न झाला असून ते मायदेशी रवाना झाले आहेत.

या भेटीमुळे आगामी काळात महाराष्ट्रात व्हिएतनामी कंपन्यांची गुंतवणूक वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, ज्याचा फायदा स्थानिक रोजगार निर्मितीला आणि अर्थव्यवस्थेला होईल.

Top Posts

‘डिजिटल अरेस्ट’ आणि सायबर फसवणूक रोखण्यासाठी तत्काळ १९३० क्रमांकावर साधा संपर्क; ‘गोल्डन अवर’चे महत्त्व अधोरेखित

अधिक वाचा

नेपाळमध्ये भीषण पूरस्थिती: अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास आपत्कालीन हेल्पलाईन जारी; अशी नोंदवा माहिती

अधिक वाचा

चाकणच्या विकासासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सर्व यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे आदेश

अधिक वाचा

लोकभवनात सामाजिक ऐक्याचे दर्शन! अनाथ, दिव्यांग मुली व महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत राज्यपालांचे रक्षाबंधन

अधिक वाचा

चाकण-भोसरी औद्योगिक पट्ट्यात २,३२० कोटींची नवी गुंतवणूक; ४९ ‘एमएसएमई’ करारांमुळे रोजगारांना मिळणार मोठी गती

अधिक वाचा