कोल्हापुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद; हजारो नागरिकांचे गारऱ्हाणे ऐकून दिले तत्काळ सोडवणुकीचे निर्देश

कोल्हापूर: महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या समस्या व प्रलंबित कामे थेट प्रशासकीय पातळीवर सोडवण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जनसंवाद कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या तक्रारी, निवेदने आणि समस्या स्वतः जाणून घेत त्यांचा त्वरित निपटारा करण्याचे आश्वासन दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित या कार्यक्रमास कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागातून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे १ हजारांहून अधिक नागरिकांनी आपली निवेदने महसूल मंत्र्यांकडे थेट सादर केली. जमिनींचे वाद, महसूल नोंदी, शेती रस्ते, फेरफार आणि स्थानिक प्रशासकीय अडचणींसंदर्भातील अर्ज यावेळी मोठ्या संख्येने प्राप्त झाले.

सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे निर्देश

जनसंवाद कार्यक्रमात निवेदने स्वीकारल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित महसूल अधिकाऱ्यांना नागरिकांच्या अर्जांवर कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश दिले. सामान्य जनता आणि शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी महसूल यंत्रणेने अधिक संवेदनशील व पारदर्शक कारभार करावा, अशी सूचना त्यांनी केली.

राज्य सरकारकडून सामान्य शेतकरी व नागरिकांच्या हितासाठी विविध कल्याणकारी निर्णय घेतले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच शासनाने शेतीसाठी माती-मुरूम वाहणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्याचे महसूल विभागाचे आदेश जारी करून बळीराजाला मोठा दिलासा दिला होता. प्रशासनाने अशाच प्रकारे नागरिकाभिमुख भूमिका घेऊन काम करावे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

स्थानिक प्रश्न वेळेत निकाली काढण्यावर भर

विविध जिल्ह्यांमध्ये जनसंवादाच्या माध्यमातून स्थानिक प्रश्नांवर जलदगतीने निर्णय घेतले जात आहेत. ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात उद्योजक व नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला विशेष मुदत दिली जाते, त्याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल विषयक अडचणींचा सातत्याने आढावा घेऊन नागरिकांना न्याय दिला जाईल, असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाचे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित

या जनसंवाद कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने आमदार सर्वश्री अमल महाडिक, अशोक माने, राहुल आवाडे, शिवाजी पाटील यांच्यासह महापौर रूपाराणी निकम उपस्थित होत्या.

प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, करवीरच्या प्रांत अधिकारी मोसमी चौगुले, डॉ. समीर शिंगटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राप्त झालेल्या प्रत्येक अर्जाची संगणकीय नोंद घेऊन त्यावर झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

Top Posts

फिनटेक क्रांती केवळ पेमेंट्सपुरती मर्यादित नको; विमा, पेन्शन आणि शेतकरी-लघुउद्योजकांना कर्जाचा विस्तार व्हावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

अधिक वाचा

भारताच्या युवा शक्तीला नीतिमूल्यांची जोड आवश्यक: आयआयएम नागपूरच्या ‘मीडिया कॉन्क्लेव्ह’मध्ये मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

अधिक वाचा

संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या ‘जीवनदूतां’चे कार्य अतुलनीय: पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते रेस्क्यू पथकांचा गौरव

अधिक वाचा

राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारात महाराष्ट्राचा गौरव: अमरावती आणि नाशिक महापालिकेची उत्तुंग कामगिरी!

अधिक वाचा

राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज मर्यादेत वाढ; आता मिळणार २ लाख रुपयांचे कर्ज!

अधिक वाचा