छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर: दिंडोरीत ३ हजार लाभार्थ्यांना मिळाला शासकीय योजनांचा थेट लाभ!

नाशिक: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा आणि सेवांचा लाभ थेट सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील कसबे वणी (ता. दिंडोरी) येथे आयोजित भव्य समाधान शिबिरात तब्बल ३,०५४ नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्रे आणि सरकारी योजनांचे लाभ हस्तांतरित करण्यात आले.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रशासनाला मोलाचा सल्ला दिला. “शासकीय योजनांचे कागदपत्रे व दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना विविध कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत, यासाठी प्रशासनाने स्वतः नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचायला हवे. अशा प्रकारच्या समाधान शिबिरांचे नियमित आयोजन करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा,” असे आवाहन मंत्री झिरवाळ यांनी केले.

एकाच छताखाली सर्व प्रमुख शासकीय सेवा

कसबे वणी येथील यश लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना महसूल, कृषी, महिला व बालविकास, आरोग्य, भूमी अभिलेख आणि पंचायत समितीशी संबंधित कामांसाठी एकाच ठिकाणी मार्गदर्शन व लाभ देण्यात आले.

यापूर्वीही राज्यभरात अशा उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला असून, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर: मुंबईत एकाच छताखाली शेकडो नागरिकांना मिळाले विविध दाखले व शासकीय योजनांचे लाभ! यामुळे सामान्य जनतेचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचत आहेत.

पारदर्शक व गतिमान प्रशासनावर भर

कार्यक्रमादरम्यान मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पाहणी केली आणि उपस्थितांशी संवाद साधला. राज्य शासन राज्यातील प्रत्येक घटकाला आदर्श व पारदर्शक प्रशासनाचा अनुभव देणार या ध्येयाने काम करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ग्रामीण भागातील मूलभूत सेवांचा विस्तार करणे आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास योजना पोहोचवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी CSR निधीची भक्कम साथ! ग्रामीण भागाचा कायापालट होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या धोरणाशी सुसंगत असे उपक्रम ग्रामीण महाराष्ट्राचे जीवनमान उंचावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती

या शिबिरास अपर जिल्हाधिकारी नीलेश जाधव, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे, उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, दिंडोरीचे तहसीलदार मुकेश कांबळे, पेठचे तहसीलदार शिवाजीराव गवळी यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर तहसीलदार मुकेश कांबळे यांनी प्रास्ताविकातून शिबिराची पार्श्वभूमी स्पष्ट केली.

Top Posts

लोकभवनात सामाजिक ऐक्याचे दर्शन! अनाथ, दिव्यांग मुली व महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत राज्यपालांचे रक्षाबंधन

अधिक वाचा

चाकण-भोसरी औद्योगिक पट्ट्यात २,३२० कोटींची नवी गुंतवणूक; ४९ ‘एमएसएमई’ करारांमुळे रोजगारांना मिळणार मोठी गती

अधिक वाचा

रविकांत तुपकर यांना पोलिसांची नोटीस; तरीही २७ ऑगस्टच्या मुंबईतील शेतकरी आंदोलनावर ठाम!

अधिक वाचा

PMFME योजनेतील राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे शेतकरी आणि महिलांच्या परिश्रमांची पावती: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

अधिक वाचा

गडकिल्ले व ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनासाठी ३% निधीला २०२७ पर्यंत मुदतवाढ; सिद्धगड होणार संरक्षित स्मारक तर भगवंतगडाचा डिजिटल सर्व्हे

अधिक वाचा