मुंबईतील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार! उपसभापती सचिन अहिर यांच्या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय मंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन

मुंबई: मुंबईतील प्रलंबित पुनर्विकास प्रकल्प, मिठागरांच्या जमिनींचा वापर, रेल्वेचा कायापालट आणि केंद्रीय खात्यांच्या जमिनींवरील रखडलेले गृहप्रकल्प मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासह उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिर यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा ठरला. या भेटीदरम्यान मुंबईच्या विकासाला नवी गती देण्याबाबत केंद्र सरकारने अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे.

मुंबई शहरासाठी एकच unified पुनर्विकास धोरण?

गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत, मुंबईतील केंद्र व राज्य सरकारच्या मालकीच्या जमिनींवरील पुनर्विकासात येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या वेगवेगळ्या नियमांमुळे पुनर्विकासाचे काम रखडले आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईसाठी एकच एकत्रित (Unified) पुनर्विकास धोरण असावे, अशी ठाम मागणी सचिन अहिर यांनी केली.

कुलाबा आणि बॅलार्ड पिअर परिसरातील हजारो झोपड्या आणि जुन्या मोडकळीस आलेल्या सेस इमारतींचा पुनर्विकास ना-हरकत प्रमाणपत्राअभावी (NOC) रखडला आहे. यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक स्वतंत्र उच्चस्तरीय बैठक आयोजित करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या निर्णयामुळे म्हाडाच्या प्रलंबित घरांना व पुनर्विकासाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गिरणी कामगारांचे पुनर्वसन आणि मिठागरांच्या जमिनी

वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याशी झालेल्या बैठकीत एनटीसीच्या (NTC) ताब्यातील बंद गिरण्यांच्या जमिनी कामगारांच्या पुनर्वसनासाठी म्हाडाकडे हस्तांतरित करण्यावर सकारात्मक चर्चा झाली. तसेच चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुद्दा केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

तसेच मिठागरांच्या (Salt Pan Lands) जमिनींबाबत निर्णय घेताना स्थानिकांना आणि पर्यावरणतज्ज्ञांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे अहिर म्हणाले. या जमिनी राज्य सरकारकडे हस्तांतरित झाल्यास तिथे बेघर, प्रकल्पग्रस्त आणि गिरणी कामगारांसाठी परवडणारी घरे उभारता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण व पायाभूत सुविधा

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान मुंबई उपनगरीय रेल्वेतील महालक्ष्मी आणि प्रभादेवी स्थानकांच्या उन्नतीकरणाचा मुद्दा मांडण्यात आला. यासोबतच सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकातील सुविधा वाढवण्याबाबत लवकरच दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि आयुष योजनांचा प्रचार

या दिल्ली दौऱ्यादरम्यान उपसभापती अहिर यांनी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच, युपीएससी (UPSC) आणि MPSC परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.

या शिष्टमंडळात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, खासदार संजय पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीरंग बारणे हे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. एकंदरीत, उपसभापती सचिन अहिर यांच्या या पहिल्या दिल्ली दौऱ्यामुळे मुंबईतील प्रलंबित विकासकामांना व पुनर्विकासाच्या मुद्द्यांना नवी दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Top Posts

दापचरी येथे साकारणार जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ; फ्रान्सच्या ‘रुंगीस’च्या धर्तीवर विकास, १० हजार रोजगारांची संधी!

अधिक वाचा

पाणी कधी शिळं होतं का? जाणून घ्या पाणी बचतीचे सोपे मार्ग आणि जलसंधारणाचे महत्त्व!

अधिक वाचा

महा वॉकेथॉन २०२६: २१ ऑगस्टला माती आणि पाण्यासाठी महाराष्ट्र चालणार; सहभागींना मिळणार ७१ हजारांची रोख बक्षिसे!

अधिक वाचा

‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा: ३० सेकंदांच्या रीलमधून जिंका २५ हजारांपर्यंत रोख बक्षिसे; राज्य शासनाचा अभिनव उपक्रम!

अधिक वाचा

नंदुरबार जलक्रांती: नर्मदेचे १० टीएमसी हक्काचे पाणी आणि तापी-उकाई सिंचन योजनांमुळे शेतीला मिळणार नवी संजीवनी!

अधिक वाचा