महाराष्ट्र मतदार यादी विशेष पुनरीक्षण: १७ ऑगस्टला प्रारूप तर १९ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार अंतिम यादी; तातडीने करा ‘हे’ काम

महाराष्ट्रात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision) वेगाने राबवला जात आहे. राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट असावे आणि सर्व नोंदी अद्ययावत राहाव्यात, यासाठी हे अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत सध्याच्या मतदार यादीतील नागरिकांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपला गणना अर्ज भरून, त्यावर स्वाक्षरी करून गृहभेटीसाठी येणाऱ्या संबंधित बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) कडे जमा करणे आवश्यक आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जे नागरिक वेळेत गणना अर्ज भरून सादर करतील, त्यांची नावे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप (Draft) मतदार यादीत समाविष्ट केली जातील.

नाव नोंदणी, दुरुस्ती आणि अर्जांचा कालावधी

प्रारूप मतदार यादी १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या नागरिकांचे नाव यादीत नसेल किंवा ज्या नवीन मतदारांना आपले नाव नोंदवायचे आहे, त्यांना विशेष संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिक आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करू शकतात.

या काळात नागरिक गरजेनुसार खालील नमुन्यांचा वापर करू शकतात:

  • नमुना क्रमांक ६: नवीन मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी किंवा प्रारूप यादीत नाव नसल्यास नाव समाविष्ट करण्यासाठी.
  • नमुना क्रमांक ७: मतदार यादीतील चुकीच्या नोंदीला किंवा मृत व्यक्तीच्या नावाला हरकत घेऊन ते वगळण्यासाठी.
  • नमुना क्रमांक ८: पत्ता बदल, नावातील दुरुस्ती किंवा इतर नोंदींमध्ये सुधारणा करण्यासाठी.

हे देखील वाचा: मुंबईची पाण्याची चिंता मिटणार! गारगाई धरण प्रकल्पाचे काम मे २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

चुकीची माहिती दिल्यास कारावास व दंडाची तरतूद

मतदार यादीत नाव नोंदवणे, दुरुस्ती करणे अथवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना नागरिकांनी अचूक माहिती देणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, अर्ज करताना कोणतीही चुकीची घोषणा अथवा खोटी माहिती दिल्यास ‘लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५०’ च्या कलम ३१ नुसार तो दखलपात्र गुन्हा ठरेल. अशा प्रकरणात दोषी आढळणाऱ्या व्यक्तीस १ वर्षांपर्यंतचा कारावास, दंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षेची कायदेशीर तरतूद आहे.

१९ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार अंतिम मतदारयादी

नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सर्व दावे व हरकतींची पडताळणी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्याची अंतिम मतदारयादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल.

तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २२ व २३ नुसार अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र नागरिकांना नमुना ६ द्वारे नाव समाविष्ट करण्याची किंवा दुरुस्ती करण्याची मुभा राहते. मतदार यादी अद्ययावत करणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, कोणत्याही निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत नागरिकांना अशा सुधारणा करता येतात.

हे देखील वाचा: नागपुरातील ‘महाआरोग्य शिबिर’ ठरले हजारो रुग्णांसाठी वरदान; एकाच छताखाली मिळाल्या मोफत आरोग्य सुविधा!

म्हणूनच, राज्यातील सर्व पात्र नागरिकांनी व नवमतदारांनी आपल्या मतदार नोंदणीची खात्री करून वेळीच BLO कडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

Top Posts

कांदळवन संवर्धन करणाऱ्यांना मिळणार बक्षीस! अतिक्रमणांवर होणार कडक कारवाई – वनमंत्री गणेश नाईक

अधिक वाचा

महाराष्ट्र मतदार यादी विशेष पुनरीक्षण: १७ ऑगस्टला प्रारूप तर १९ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार अंतिम यादी; तातडीने करा ‘हे’ काम

अधिक वाचा

कारगिल विजय दिवस: अदम्य शौर्य अन् सर्वोच्च बलिदानाला सलाम; मुंबईतील लोकभवनात वीरसैनिकांचा विशेष सन्मान!

अधिक वाचा

मुंबईची पाण्याची चिंता मिटणार! गारगाई धरण प्रकल्पाचे काम मे २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

अधिक वाचा

पुणे शहराची वाहतूक कोंडी फुटणार! HCMTR, रिंगरोड अन् बोगद्याच्या तीन मोठ्या प्रकल्पांना वेग देण्याचे निर्देश

अधिक वाचा