नवीन योजना मागेल त्याला शेततळे सुरु , मंत्रिमंडळ मजुरी



नवीन योजना मागेल त्याला शेततळे  सुरु , मंत्रिमंडळ मजुरी :

शासकीय योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा विस्तार करून त्या योजनेमध्ये आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वैयक्तिक शेततळ्याचा समावेश करण्याचा निर्णय  घेण्यात आला. या झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वतः  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे  होते.




शेतकऱ्यांना यापूर्वी “मागेल त्याला शेततळे” या योजने मध्ये देण्यात येत असलेल्या ५० हजार रुपयांच्या अनुदानात सरकारने ५० टक्के वाढ करून या योजनेत लाभार्थ्यांना वेगवेगळ्या आकारमानाच्या वैयक्तिक शेततळ्यासाठी सरकारने निश्चित केलेला खर्चाच्या मापदंडा एवढे किंवा ७५ हजार रुपये या पैकी जी रक्कम कमी असेल तेवढे शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णयही शासनाद्वारे घेण्यात आला आहे.




 शेतकऱ्यांना शेततळ्याच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी ,   हमखास आर्थिक उत्पन्नाची व  पिकांच्या शाश्वत उत्पादनाची  खात्री मिळावी या उद्देश्याने वित्तमंत्र्यांनी सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय भाषणात ही घोषणा केली होती . त्या घोसानेश आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे .

Magel Tyala Shettale – पात्रता निकष

लाभार्थी /शेतकरी किमान 0.60 हेक्टर तरी  शेतजमिनीचा मालक असावा.

 या योजनेसाठी सर्व शेतकरी मग शेतकरी गट असो किंवा वैयक्तिक शेतकरी सर्व पात्र आहेत.




या योजनेंतर्गत नोंदणीसाठी शेतकरी  जवळच्या पंचायत किंवा तालुका कार्यालयाशी देखील संपर्क साधू शकतात.

mahadbt farmer scheme

https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Home/  या वेब साईट/ महाडीबिटी फार्मर स्कीम ( mahadbt farmer scheme)

अर्थात एक शेतकरी एक अर्ज अनेक योजना या पोर्टल वर  शेतकऱ्यांनी अर्ज करावा.




इच्छुक अर्जदार व शेतकरी आपले सरकारच्या अधिकृत वेबसाइट भेट देऊन माहिती घेऊ शकतात  

👉 https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ 

वर भेट देऊ शकतात.



मागेल त्याला शेततळे ऑनलाइन नोंदणीसाठी Magel Tyala Shettale 

खालील लिंक वर क्लिक करा.

 https://egs.mahaonline.gov.in/

नोंदणी झाल्या नंतर, लाभार्थी  अनुदान योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी त्यांच्या USER ID आणि PASSWORD सह लॉग इन करू शकतात.

Top Posts

महाराष्ट्रातील नवीन पिक नुकसान भरपाई आणि ₹३१,६२८ कोटींनी भरीव मदत योजनेचा सविस्तर आढावा

अधिक वाचा

ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र 2025: संपूर्ण माहिती, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा

७५% अनुदानासह महाराष्ट्रातील भटक्या जमातींना मोठा फायदा – कुक्कुटपालनातून मिळवा नवे रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य!

अधिक वाचा

लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करावी? | Ladki Bahin Yojana eKYC Process 2025

अधिक वाचा

नवीन GST नियम 2025 | Navin GST Rules आणि त्याचे फायदे | GST 2.0 अपडेट्स

अधिक वाचा