कांदा लागवडी विषयी संपूर्ण माहिती

 कांदा लागवडी  विषयी संपूर्ण  माहिती :-

   नमस्कार मंडळी 🙏

   शेती तुमची सहकार्य आमचे …

  आपण आज या लेखा मध्ये कांदा लागवडी विषयीची माहिती बघणार आहोत .

( onion farming full detail information in marathi ) 

 

                                     ( onion farming full detail information in marathi )

   कांदा लागवडी विषयी संपूर्ण  माहिती मराठी मध्ये .
 ● लागवडीची वेळ   :-
       खरीप  : जुलै -ऑगस्ट 
      रांगडा : सप्टेंबर – आक्टोबर 
      रब्बी / उन्हाळी : नोव्हेम्बर -डिसेंबर
सुधारित वाणाच्या जाती :-
    खरीप : फुले समर्थ ,बसवंत ७८० , अँग्रिफाउंड डार्क रेड
    रांगडा : बसवंत ७८० , फुले समर्थ , एन -२-४-१
    उन्हाळी : एन २-४-१ , अँग्रिफाउंड लाईट रेड , अर्का निकेतन .
लागवडीचे अंतर :
    खरीप १५ ×१० से.मी.
    रांगडा १५ x१० से.मी. रब्बी / उन्हाळी : १५ – १० से.मी.
● बियाण्याचे प्रमाण किती असावे :-
    ८ ते १० किलो प्रति हेक्टर.
खतांची मात्रा किती असली पाहिजे :-
 
   १०० ५० ५० नत्र स्फुरद पालाश किलो / हेक्टर.
● अन्नद्रव्य व्यवस्थापन :-
   १ ) सेंद्रिय खते २५ ते ३० टन शेणखत / हेक्टर
   २ ) जीवाणु खते : अझोस्पिरीलम व स्फुरद विरघळणारे जीवाणु २५ ग्रॅम / किलो बियाण्यास पेरणीपुर्वी चोळावे.

● आंतरमशागत :-
   -१५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करणे.
   – लागवडीपासून ३० व ४५ दिवसांनी वरखताची मात्रा द्यावी.
   – कांद्याच्या अधिक उत्पादन व तण नियंत्रणासाठी ऑक्झीफ्लोरफेन २३.३ टक्के ई.सी. व ० .०६८ क्रियाशिल
     घटक ७.५ मि.ली.
   – व क्युझोलफॉप ईथाईल ५ टक्के ई.सी.व ०.०२ कि. क्रियाशील घटक १० मिली या तण नाशकांची १० लिटर
    पाण्यात लागवडीनंतर २५ दिवसांनी फवारणी करून ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
● खते देण्याची वेळ :-      (कांदा लागवडी विषयी संपूर्ण  माहिती मराठी मध्ये .)
 

       १ ) रब्बी हंगामाचा कांदा पुर्नलागवडीपुर्वी १० -१५ दिवस अगोदर गंधक हेक्टरी ४५ किलो या प्रमाणात जिप्सम
      किंवा गंधकाच्या स्वरुपात मातीत मिसळावे.
       
       २ ) सेंद्रिय खते लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावे.
       ३ ) रासायनिक खत ५० :५० :५० किलो नत्र: स्फुरद पालाश / हेक्टर लागवडीच्या वेळी द्यावी व उर्वरीत ५०
       किलो नत्र २ समान हप्त्यात विभागून ३० व ४५ दिवसांनी द्यावे.
    

( onion farming full detail information in marathi )

    
→ आता आपण कीड व रोगाबद्दल जाणून घेऊ:-

   ● करपा रोग :-
    याच्या नियंत्रणासाठी डायथेन एम ४५ ( ० .३ % ) किंवा टेब्युकोनॅझोल ( ० .१ % ) हे बुरशीनाशक १० ते १५
   दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारावेत.
   ( किटकनाशक व बुरशीनाशकाचे प्रमाण १० लि. पाण्यासाठी दिले आहे.)


  ●फुलकिडे :
     प्रौढआणि पिले पाने खरडवतात. आणि त्यातून बाहेर येणारा रस शोसून घेतात . त्यामुळे पानांवर पांढरे डाग
    पडतात यालाच टाक्या असे म्हणतात .
    त्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० % ईसी १५ मि.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ % ई.सी. ६ मि.ली.
    या
    किटकनाशकांच्या आलटुन पालटुन फवारण्या करावा . अधून मधून ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.
    फवारणी करतांना चिकट द्रव्याचा ( ० .१ % ) वापर करावा.



  ● उत्पादन खरीप १०० ते १५० क्विंटल / हेक्टर रांगडा : २०० ते २५० क्विंटल / हेक्टर रब्बी / उन्हाळी : २५० ते
    ३५० क्विंटल / हेक्टर.
 
     तुम्हाला जर हि माहिती उपयोगी वाटत असेल . तर कृपया  हा लेख इतरांना पाठवा.

     धन्यवाद !

Top Posts

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना: अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असूनही अनुदान रखडले; ७६ कुटुंबांची दीड कोटींची मदत रखडली!

अधिक वाचा

सायबर गुन्हे आणि AI चे आव्हान! ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सायबर विभागाचे DIG संजय शिंत्रे यांचे विशेष मार्गदर्शन

अधिक वाचा

महसूल विभागाने अधिक जबाबदारीने आणि जनहितार्थ काम करावे; अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांचे निर्देश

अधिक वाचा

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसाठी मोठी संधी! गुंठेवारी नियमित करण्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे आवाहन

अधिक वाचा

महाराष्ट्रात उभारणार ₹४,१५० कोटींचे ‘युनायटेड साधव इंटिग्रेटेड मेरीटाईम कॉम्प्लेक्स’; पालघरच्या नांदगावमध्ये जागतिक दर्जाचे जहाजबांधणी केंद्र!

अधिक वाचा