ई-केवायसी प्रक्रिया तीन प्रमुख मार्गांनी केली जाऊ शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांना हा प्रक्रिया जलद आणि सुलभ करण्याचा पर्याय मिळतो.
खाली farmer e-kyc साठी ची संपूर्ण माहितीची PDF दिलेली आहे कृपया काळजीपूर्वक बघून घ्या.
1. मोबाईलद्वारे ई-केवायसी soyabean kapus anudan ekyc
जर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक असेल, तर ई-केवायसी प्रक्रिया अगदी सोपी आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरून OTP (वन टाइम पासवर्ड) येतो, जो योग्य ठिकाणी टाकून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते. यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. शेतकरी त्यांच्या घरी बसूनच मोबाईलवरून ही प्रक्रिया करू शकतात.
2. सीएससी (CSC) केंद्रद्वारे बायोमेट्रिक ई-केवायसी
ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक मोबाईलशी लिंक नाही, त्यांच्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन बायोमेट्रिक यंत्राच्या सहाय्याने ई-केवायसी प्रक्रिया करणे. यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या अंगठ्याच्या पडताळणीद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते.
3. कृषी सहाय्यकांच्या मदतीने ई-केवायसी
शेतकरी स्वतः ई-केवायसी करू शकत नसतील, तर ते आपल्या तालुक्यातील कृषी सहाय्यकांच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. कृषी सहाय्यक आपल्या लॉगिन आयडी व पासवर्डच्या सहाय्याने शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया करू शकतात.