कुक्कुट पालन योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा
online form Kukut Palan Anudan Yojana Maharashtra
लाभार्थ्याला कुक्कुट पालन योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. हा अर्ज करण्या-साठी खालील प्रमाने प्रोसेस फॉलो करा.
१. तुमच्या ब्राउजरमध्ये https://www.mahabms.com हा वेब ॲड्रेस टाईप करा.
किंवा येथे क्लिक करा.
२. वरील वेब ऍड्रेस तुमच्या ब्राउजरमध्ये टाकल्या नन्तर तुमच्या समोरील स्क्रीनवर पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट हि ओपन होईल.
३. वेबसाईटच्या सईदच्या नेव्हिगेशन बारवर अनेक पर्याय तुम्हाला तेथे दिसतील त्यापैकी तुम्ही अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
४. नोंदणीसाठी चा अर्ज हा तुमच्या समोरील स्क्रीनवर ओपन होईल, तेथे जी माहिती विचारली आहे ती त्या प्रमाणे संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा.
५. इतरील सर्व माहिती हि भरल्यानंतर अर्जदाराने त्याचा स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो व स्वाक्षरी तेथे दिलेल्या फॉरमॅटमध्ये आणि योग्य त्या साईजमध्ये अपलोड करायचे आहे.
६. फोटो व स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर तुमच्या राशन कार्डवर जेवढे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांचे आधारकार्ड नंबर आणि त्यांची इतर माहिती दिलेल्या चौकटीमध्ये भरायची आहे. जो अर्जदार आहे, त्याने त्याचे स्वतःचे हे नाव वगळून इतर सदस्याची माहिती हि भरायची अशी सूचना ah.mahabms.com या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
७. वरील सांगितलेली सर्व माहिती व्यवस्थित भरल्याच्या नन्तर, जसे हि तुम्ही जतन करा पर्यायावर क्लिक कराल त्यानंतर तुमचा युजर आयडी (user id )आणि पासवर्ड ( password )तुमच्या मोबाईलवर पाठविला जाईल. तो युजर आय डी व पासवर्ड टाकून तुम्ही लॉगीन करा.
८.या ठिकाणी लॉगीन केल्यावर काही माहिती हि प्रश्नांच्या स्वरुपात तुम्हाला विचारली जाईल त्यांचे बरोबर उत्तरे द्या व अर्ज जतन करा.
९. तुमचा अर्ज जतन झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
मित्रांना हि शेअर करा: