जनावरांच्या गोठ्यासाठी अर्ज कोठे करायचा.

 शेतकरी मित्रानो खालील प्रमाणे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.


➥तुम्हाला गाय गोठा साठी अर्ज हा तुमच्या जवळील पशुवैद्यकीय दवाखान्यात करायचा आहे.

➥अर्ज हा ऑफलाइन पद्धतिने आहे.

➥या अर्जाची शेवटची तारीख तुम्हाला त्या पशुवैद्यकीय दवाखान्यात मिळेल 

किंवा 

➥योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करायचा आहे .

➥त्यानंतर ग्रापंचायतीचे नाव, तालुका, जिल्हा आणि अर्जाच्या उजवीकडे तारीख टाकून तुमचा फोटे चिटकावयाचा आहे.

➥त्यानंतर खाली अर्जदाराचे नाव, पत्ता, जिल्हा आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.

➥अर्जामध्ये तुमच्या कुटुंबाचा प्रकार म्हणजे अनुसुचित जाती, जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, महिलाप्रधान कुटुंब, 2008 च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्प भुधारक किंवा सीमांत शेतकरी यापैकी ज्या प्रकारा आपले कुटुंब आहे त्याचा उल्लेख करावा लागणार आहे.

➥तुम्ही जो प्रकार निवडला त्याच्या कागपत्राचा पुरवाही जोडावा लागणार आहे.

➥ज्यांनी अर्ज केलेला आहे त्याच्या कुटुंबातील सदस्यसंख्या ती पण 18 वर्षा पुढील सदस्यांची संख्या नमूद करायची आहे.शेवटी घोषणा पत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करायचा आहे.


➥अर्जा सोबत मनरेगा जॅाब कार्ड, 8- अ, सात बारा उतारा, मालमत्ता नमुना 8 अ उतारा जोडावा लागणार आहे .


➥आणि शेतकऱ्याकडे मनरेगाचे  जॉब कार्ड लागणार आहे.


तुमाला अर्ज आहे ग्रामपंचायत मध्ये मिळेल .  MAHA AGRI  

Post a Comment

4 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.