मुंबईत १००० विद्यार्थ्यांसाठी आधुनिक वसतिगृह! मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘सर जे. जे. कला संस्था वसतिगृहा’च्या इमारतीची पाहणी

मुंबई: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी केवळ दर्जेदार शिक्षणच नाही, तर राहण्यासाठी उत्तम आणि सोयी-सुविधांनी सज्ज असे निवासस्थान असणेही तेवढेच गरजेचे आहे. याच उद्देशाने राज्य शासन विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त वसतिगृहे उभारण्यावर विशेष भर देत आहे, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे.

मुंबईतील वांद्रे पूर्व येथील कलानगर परिसरात ‘सर जे. जे. कला संस्था वसतिगृहाच्या’ नव्या भव्य इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. या बांधकामाच्या प्रगतीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी कामाच्या गुणवत्तेची पडताळणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना हे काम वेळेत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश दिले.

शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या विकासावर शासनाचा भर

उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत सध्या मुंबईत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवले जात आहेत. नुकतेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे काम देखील दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. यासोबतच, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सोय व्हावी यासाठी राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाची नवी देखणी इमारत देखील लवकरच विद्यार्थ्यांच्या सेवेत रुजू होणार आहे.

‘सर जे. जे. कला संस्था वसतिगृह’ इमारतीची वैशिष्ट्ये आणि आधुनिक सुविधा:

मुंबईत शिक्षणासाठी येणाऱ्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांना हक्काचे आणि सुरक्षित घर मिळावे, यासाठी या वसतिगृहाची रचना अत्यंत आधुनिक पद्धतीने करण्यात आली आहे. या प्रकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • १००० विद्यार्थ्यांची क्षमता: या भव्य वसतिगृहात एकूण १,००० विद्यार्थ्यांची राहण्याची सोय असेल. यामध्ये ५०० मुले आणि ५०० मुलींसाठी स्वतंत्र विभाग असतील.
  • ३६४ स्वतंत्र खोल्या: वसतिगृहाच्या इमारतीत एकूण ३६४ खोल्यांची रचना करण्यात आली आहे. मुलांसाठी १८२ आणि मुलींसाठी १८२ खोल्या राखीव आहेत.
  • खोलीतील सोयी-सुविधा: प्रत्येक खोलीमध्ये ३ विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था असून, प्रत्येकासाठी स्वतंत्र कॉट आणि कपाट दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक खोलीला स्वतंत्र प्रसाधनगृह (अटॅच बाथरूम) असेल, ज्यामध्ये गिझरद्वारे गरम पाण्याची सोय असेल.
  • इतर आधुनिक सुविधा: विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सुसज्ज वाचन कक्ष (Reading Room), शारीरिक आरोग्यासाठी अत्याधुनिक व्यायामशाळा (Gym), इनडोअर प्ले एरिया, डबल हाईट कॉमन रूम, वॉर्डन रूम आणि प्रत्येक मजल्यावर शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.

“मुंबईत कला शाखेचा अभ्यास करणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि राहण्यासाठी घरगुती व सुरक्षित वातावरण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. हे नवे वसतिगृह विद्यार्थ्यांच्या या हक्काची पूर्तता करेल,” असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

या पाहणी दौऱ्याच्या वेळी तंत्र शिक्षण सहसचिव संतोष खोरगडे, अवर सचिव प्रवीण मुंढे, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, उपकला संचालक विनोद दांडगे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि इतर संबंधित विभागांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

Top Posts

ग्रामीण ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत मिळणार दर्जेदार उपचार; आरोग्य विभागाकडून रुग्णालयनिहाय सेवांची नवी मानके जाहीर – मंत्री प्रकाश आबिटकर

अधिक वाचा

‘कोलाहल’ प्रदर्शनातून मानवी अंतर्मनाचा प्रभावी वेध; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले चित्रकार चंद्रगुप्त भालेराव यांचे कौतुक

अधिक वाचा

महाराष्ट्रात पीयूसी (PUC) तपासणी शुल्कात वाढ; दुचाकी ते चारचाकी वाहनांसाठी नवे दर लागू, पाहा संपूर्ण दरपत्रक

अधिक वाचा

चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विशेष रोडमॅप – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अधिक वाचा

सर्वोत्तम नागरिक सन्मान २०२६: समाजहितासाठी योगदान देणाऱ्या १८ मान्यवरांचा गौरव; राज्यपाल जिष्णु देव वर्मा व मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती

अधिक वाचा