केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक घेतले ‘लालबागच्या राजा’चे दर्शन; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही राहिले उपस्थित

मुंबई: गणेशोत्सवाच्या मंगलमयी वातावरणात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी मुंबईतील सुप्रसिद्ध परळ येथील ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवात उपस्थित राहून सहकुटुंब बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सोनल शाह, मुलगा जयेश शाह, मुलगी आणि नात उपस्थित होते. शाह कुटुंबीयांनी लालबागच्या राजाच्या चरणी लीन होऊन देशाच्या आणि जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

विशेष म्हणजे, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील नामांकित गणेश मंडळांना भेटी दिल्या. लालबागच्या राजाच्या दर्शन सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, आमदार तथा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून भव्य स्वागत

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्र्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, उपाध्यक्ष सागर गुप्ता आणि मानद सचिव सुधीर साळवी यांनी अमित शाह यांचा सन्मान केला. बाप्पाच्या भव्य आणि मनमोहक रूपाचे दर्शन घेतल्यानंतर गृहमंत्र्यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. यंदाची श्री गणेशाची नयनरम्य मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार संतोष कांबळी यांनी साकारली आहे.

मुंबई दौऱ्यादरम्यान लालबागच्या दर्शनासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वांद्रे येथे सपत्नीक गणरायाचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक ऐक्य व संस्कृतीचे प्रतीक आहे. यंदा शासनाकडूनही गणेशोत्सवाचा गौरव वाढवण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आले असून, राज्यभरात राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राबवली जात आहे.

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक देशभरातून येत असतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस प्रशासनाकडून लालबाग आणि परळ परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

Top Posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी घेतले गणरायाचे सपत्नीक दर्शन; महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित

अधिक वाचा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘नंदगिरी’ निवासस्थानी घेतले गणरायाचे सपत्नीक दर्शन; प्रमुख नेत्यांची उपस्थिती

अधिक वाचा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक घेतले ‘लालबागच्या राजा’चे दर्शन; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही राहिले उपस्थित

अधिक वाचा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वांद्रे येथे सपत्नीक घेतले गणरायाचे दर्शन; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित

अधिक वाचा

अकोला शेतकरी कर्जमाफी: ११ हजार ५० पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर; तात्काळ आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

अधिक वाचा