अतिवृष्टी भरपाई 2022 जाहीर | शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रू. नुकसान भरपाई मिळणार

 अतिवृष्टी भरपाई जाहीर | शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रू. नुकसान भरपाई मिळणार, 

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra  2022

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra »

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 


शेतकऱ्यांना मदत दुप्पट अन् तीही तीन हेक्टरपर्यंत..! सरकारचा अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा  मिळणार आहे.  राज्यामधील जिरायती (कोरडवाहू) अतिवृष्टीग्रस्त  शेतकऱ्यांना दुप्पट मदत आणि तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय हा राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.अतिवृष्टी, महापुराचा फटका राज्याच्या अनेक भागांमध्ये  बसलेला असताना शेतकऱ्यांना सरकारने  मोठा दिलासा दिला आहे.



मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंगळवारच्या विस्तारानंतर  मंत्रालयात झाली. त्या बैठकीमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान-भरपाईच्या मदतीपोटी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ NDRF) निकषाच्या दुप्पट मदत हि देण्याचा निर्णय हा सरकारचा झाला.माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली. {Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra}



जिरायती शेतीसाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 6800 रुपये प्रमाणे मदत हि राष्ट्रीय आपत्ती मदत निधीच्या निकषानुसार हि मदत दिली जाते, आणि आतापर्यंत ही मदत शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच दिली जात होती. यापुढे शेतकऱ्यांना ही मदत हेक्टरी 13 हजार 600 रुपये इतकी दिली जाणार असून ती मदत तीन हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे. म्हणजे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त 40 हजार 800 रुपये इतकी मदत मिळू शकेल. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत बागायती शेतीला वाढीव मदत देण्यासंदर्भात चर्चा झाली नाही. त्याबाबतचाही   निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.



मदत दुप्पट अन् तीही तीन हेक्टरपर्यंत.

एनडीआरएफच्या ( NDRF ) निकषांपलीकडे  जाऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळातही मदत देण्याची भूमिका हि घेण्यात आली होती. शेतीसाठी 6 हजार 800 रुपयांऐवजी मात्र त्यावेळी जिरायती  हेक्टरी 10 हजार रुपये मदत आतापर्यंत देण्यात येत होती.

शेतकऱ्यांना आतापर्यंत कधीही दिली गेली नाही एवढी मदत आमच्या सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीने राज्यात यंदाच्या  १५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे. आजच्या या सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल.

 “Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra”

या सरकारच्या तीन हेक्टर च्या निर्णयाचे तुम्हाला काय वाटते ते आम्हाला काली कमेंट ( Comment ) करून नक्की सांगा.

मंजुरी मिळालेल्या जिल्ह्याची यादी लवकरच आपल्या या maha-agri वेबसाइट वर प्रदर्शित करण्यात येईल.

किती हेक्टर शेतकऱ्यांना  मर्यादेत मदत मिळेल?

→ दोन ऐवजी तीन हेक्टर शेतकऱ्यांना आता  मर्यादेत मदत मिळेल.

 जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आता किती मदत मिळू शकते?

→ एक हेक्टरी 13 हजार 600 रुपये या प्रमाणे तीन हेक्टर पर्यंत 40 हजार 800 रुपये इतके मिळेल.

मित्रांना नक्की शेअर करा:

Top Posts

नेपाळमध्ये पुरामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकार सरसावले; ऑनलाईन लिंक आणि हेल्पलाईन जारी

अधिक वाचा

हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना गती; सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व आधुनिकीकरणावर सकारात्मक चर्चा

अधिक वाचा

गरोदर मातांमधील तीव्र रक्तक्षयावर मोफत मात! राज्यात ९१ टक्के महिलांवर आयर्न सुक्रोजद्वारे यशस्वी उपचार

अधिक वाचा

नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी आपत्कालीन हेल्पलाईन सुरू; प्रशासनाचे नातेवाईकांना महत्त्वाचे आवाहन

अधिक वाचा

‘डिजिटल अरेस्ट’ आणि सायबर फसवणूक रोखण्यासाठी तत्काळ १९३० क्रमांकावर साधा संपर्क; ‘गोल्डन अवर’चे महत्त्व अधोरेखित

अधिक वाचा