पिकांच्या नोंदणीसाठी एकच ॲप; येत्या खरिपात देशभर होणार लागू , बघा कोणते असणार ॲप…..

 पिकांच्या नोंदणीसाठी एकच ॲप; येत्या खरिपात देशभर होणार लागू- महा ॲग्री

digital crop survey app download

maharashtra krushi vibhag  : शेतकरी बंधूंनो समोरील खरीप हंगामात देशभरात ई-पीक पाहणी { E-PIK pahani }अर्थात पिकांच्या नोंदणीसाठी एकच ॲप हे शासनाकडून वापरण्यात येणार आहे. ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ {digital crop survey app }या ॲपच्या माध्यमातून सर्व पिकांची नोंदणी हि करण्यात येणार आहे. या वर्षी च्या खरीप आणि रब्बी हंगामात याची प्रायोगिक चाचणी हि देखील झाली आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात आता ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ या ॲपच्या अंतर्गत ३४ जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तालुक्यात राबविण्यात येणार आहे. 



डिजिटल क्रॉप सर्व्हे अँप कसे असणार आहे?

जवळपास साडेतीन हजारांहून अधिक गावांमध्ये करण्यात येणाऱ्या पिकांच्या नोंदणी ह्या थेट सातबारावर होणार आहेत. अशी ही गावे वगळून अन्य ठिकाणी काही राज्य सरकारचे ई-पीक पाहणी ॲप हे वापरले जाणार आहे. आधी पिकांची नोंदणी सातबारावर करण्यासाठी गावामधील तलाठी कार्यवाही हि करीत होते. आता त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने ई-पीक {e-pik pahani  } पाहणी हे ॲप सुरू केले.आता त्यानुसार तिन्ही हंगामातील पिकांची नोंदणी हि या digital crop survey ॲपनुसारच झाली. यंदाच्या खरीप हंगामात केंद्र शासनाच्या सर्वेक्षण निर्देशानुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील २ गावे व नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यामधील सर्व गावे अशा ११४ गावांमध्ये डिजिटल क्रॉप सर्व्हे, या केंद्र शासनाच्या ॲपनुसार प्रायोगिक तत्त्वावर ई-पीक पाहणी हि करण्यात आली. तर रब्बी हंगामात गावांची संख्या हि ११४ वरून १४८ एवढी करण्यात आली असून, प्रत्येक जिल्ह्यातील ३ गावांचा समावेश हा करण्यात आला आहे. उन्हाळी हंगामात साडेतीन हजारांहून अधिक नोंदणी हि ॲपद्वारे ई-पीक पाहणी नाेंदणी करण्यात येणार आहे.



ह्या अँपद्वारे नोंदी थेट होणार सातबारा उताऱ्यावर होणार.

खरीप आणि रब्बी हंगामात राज्य शासनाच्या ई-पीक पाहणी {e-pik pahani}ॲपच्या व्यतिरिक्त डिजिटल क्रॉप सर्व्हे यानुसार दुहेरी नोंदणी हि करण्यात आली होती. परंतु , आता उन्हाळी हंगामात या साडेतीन हजार गावांत एकच पीक पाहणी ती देखील डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या नेहमीच्या ई-पीक पाहणीच्या नोंदी ह्या थेट सातबारावर नोंदविल्या जातात. उन्हाळी हंगामातील या साडेतीन हजार गावांत  होणाऱ्या डिजिटल क्रॉप सर्व्हेच्या नोंदी-देखील आता थेट सातबारा उताऱ्यावर घेतल्या जातील. त्यामुळे या गावांत एकच पीक पाहणी हि होणार आहे.



रब्बी हंगामा मध्ये वापरण्यात आलेल्या डिजिटल क्रॉप सर्व्हे या ॲपच्या माध्यमातून ८२ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंदणी हि शेतकऱ्यांनी केली आहे. आणि ही नोंदणी ८० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने त्याची व्याप्ती हि आता उन्हाळी हंगामात वाढवण्यात येणार आहे. तर खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ६५ टक्के ह्या क्षेत्रावरील पिकांची नोंदणी केली होती. या ॲपमध्ये आलेल्या तांत्रिक समस्यांमुळे त्याला प्रतिसाद हा तुलनेने कमी मिळाला होता. त्यामुळेच रब्बी हंगामाच्या प्रतिसादावर ह्या उन्हाळी हंगामातील गावांची संख्या हि वाढविण्यात आली आहे. – ,भूमी अभिलेख विभाग- श्रीरंग तांबे, राज्य समन्वयक, ई-पीक पाहणी उपक्रम

Web Title: A single app for maharashtra farmer crop registration It will be applicable to all over the country in the upcoming kharif hangam 

Top Posts

महाराष्ट्रातील नवीन पिक नुकसान भरपाई आणि ₹३१,६२८ कोटींनी भरीव मदत योजनेचा सविस्तर आढावा

अधिक वाचा

ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र 2025: संपूर्ण माहिती, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा

७५% अनुदानासह महाराष्ट्रातील भटक्या जमातींना मोठा फायदा – कुक्कुटपालनातून मिळवा नवे रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य!

अधिक वाचा

लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करावी? | Ladki Bahin Yojana eKYC Process 2025

अधिक वाचा

नवीन GST नियम 2025 | Navin GST Rules आणि त्याचे फायदे | GST 2.0 अपडेट्स

अधिक वाचा