नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीचा मोठा दिलासा: १ लाख २ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले ८६१ कोटी रुपये; जाणून घ्या सविस्तर

Nanded Karjmukti Yojana Update: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत नांदेड जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वेगाने लाभ जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या तीन याद्यांनुसार नांदेड जिल्ह्यातील १ लाख २ हजार २१८ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तब्बल ८६१ कोटी ५६ लाख रुपये इतकी कर्जमुक्तीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंतची कर्जमुक्तीची आकडेवारी

शासनाकडून महाआयटीच्या संगणकीय प्रणालीद्वारे अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील बँकांनी एकूण २ लाख २४ हजार ८४७ थकीत कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर नोंदवली होती. त्यानुसार:

  • पात्र शेतकरी संख्या: १ लाख ९७ हजार ९१२
  • आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले शेतकरी: १ लाख ४१ हजार ८३५
  • प्रत्यक्ष लाभ जमा झालेले शेतकरी: १ लाख २ हजार २१८
  • खात्यावर जमा झालेली एकूण रक्कम: ₹८६१.५६ कोटी

जिल्ह्यातील लाभार्थ्यांची पहिली यादी २५ जुलै २०२६, दुसरी यादी ११ सप्टेंबर २०२६ आणि तिसरी यादी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध झाली आहे. या योजनेसोबतच शेतीसाठी लागणाऱ्या इतर खर्चाकरिता शेतकरी PM Kisan 24th Installment आणि नमो शेतकरी योजना तसेच पेरणीच्या हंगामात अनुदानासाठी रब्बी ज्वारी बियाणे अनुदान योजना यांसारख्या विविध सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत.

कर्जमाफी योजनेचे महत्त्वाचे निकष व स्वरूप

शासनाच्या २ जून २०२६ च्या शासन निर्णयानुसार, कुटुंबाऐवजी ‘वैयक्तिक शेतकरी’ हा निकष मानून अल्प, अत्यल्प व बहुभूधारक असा कोणताही भेदभाव न करता ही कर्जमुक्ती दिली जात आहे.

  • २ लाखांपर्यंत पूर्ण कर्जमाफी: १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीककर्ज किंवा पुनर्गठीत कर्ज ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असल्यास आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत न फेडल्यास २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात आहे.
  • एकरकमी परतफेड योजना (OTS): ज्या शेतकऱ्यांकडे २ लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकीत आहे, त्यांनी २ लाखांवरील अतिरिक्त रक्कम ३१ मार्च २०२७ पूर्वी भरल्यास त्यांना शासनाकडून २ लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येतो.
  • प्रोत्साहनपर लाभ: नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

यादीत नाव नसल्यास काय करावे?

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पुढील टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जातील. ज्या शेतकऱ्यांची नावे अजूनही यादीत आलेली नाहीत, त्यांनी घाबरून न जाता किंवा कोणतेही टोकाचे पाऊल न उचलतात खालील पर्यायांचा वापर करावा:

  1. आपल्या संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून कर्ज खात्याची स्थिती जाणून घ्यावी.
  2. तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील ‘तक्रार निवारण समिती’ किंवा तालुका सहायक निबंधक कार्यालयात लेखी तक्रार नोंदवावी. (जिल्ह्यात प्राप्त १,८४० तक्रारींपैकी १,६६६ तक्रारींचे निवारण आधीच झाले आहे.)
  3. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील स्वतंत्र तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधावा. यासाठी ९२८४३५०७३१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, कर्जमाफीचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

Top Posts

ग्रामीण मजुरांसाठी खुशखबर! आता मिळणार १५० दिवसांचा हमी रोजगार; २५ दिवसांच्या अतिरिक्त कामाची मोठी घोषणा

अधिक वाचा

आरटीएस सेवांच्या कामगिरीत ९० टक्क्यांहून अधिक उद्दिष्ट गाठा; सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांचे निर्देश

अधिक वाचा

६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राचा डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यातील तीन कलाकारांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

अधिक वाचा

मोफत चारा बियाणे योजना: शेतकऱ्यांना ४ हजार तर शेतकरी गटांना २० हजार रुपयांचे १००% अनुदान; असा करा अर्ज!

अधिक वाचा

कडधान्ये आत्मनिर्भरता अभियानाचा पहिला वर्ष वाया? ५०० कोटींच्या संशोधन निधीतून एकही प्रकल्प मंजूर नाही; केंद्र सरकार आता ॲक्शन मोडमध्ये

अधिक वाचा