कांदा चाळ उभारणी अनुदान.

 ऑनलाईन अर्ज सुरु कांदा चाळ योजना निधी आला  बघा जीआर – Maha-agri 




शेतकरी मित्रानो mahadbt web portal  वर  कांदा चाळ योजना संदर्भात  ऑनलाईन अर्ज मागवून त्यांना सोडत या पद्धतीने सर्व लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे या संदर्भातील शासन कडून निर्णय म्हणजेच जी आर हा  नुकताच महाराष्ट्र शासनच्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित  झालेले आहे. ऑनलाईन अर्ज कांदा चाळ  कसा करावा या संदर्भातील सर्व माहिती या लेखामध्ये दिलेली आहे कृपया सर्व माहित सविस्तर वाचून घ्यावी.

दिनांक १४ डिसेंबरचा कांदा चाळ योजना  जी आर बघा.



राज्यात कांदा चाळ उभारणी प्रकल्प  राबविण्यास ६२.५० कोटीच्या निधीच्या कार्यास  शासकीय  मान्यता देण्यात आली असल्याचा हा शासन निर्णय दिनांक १४ डिसेंबर २०२१ रोजी राज्य महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आलेला आहे. खालील दिलेल्या  बटनाला क्लिक करून तुम्ही तो शासनाचा जी आर सविस्तरपणे वाचू शकता.

शेतकऱ्यांच्या कांदा चाळ योजना फायद्याची.

अनेक महाराष्ट्रील  शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये कांद्याचे पिक सातत्याने  घेत असतात. कांदा हे पिक खूप  संवेदन शील असते त्यामुळे या पिकाची योग्य प्रकारे देखभाल करणे हे गरजेचे असते. यासाठीच  कांदा चाळ हि योजना सुरु करण्यात आलेली आहे.कांदा पिकांचे उत्पादन शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये  घेतात व त्यांना त्यासाठी कांद्याची साठवणूक करण्यासाठी कांदा चाळ उपलब्ध व्हावी.

ऑनलाईन अर्ज हा या योजनेसाठी mahadbt web portal वर करावा लगणार .




कांदा चाळ बांधण्यासाठी अनेक शेतकरी बांधवांना आर्थिक अडचण निर्माण होत असते. त्यामुळे ते शेतकरी कांदा चाळ हि बांधू शकत नाही आणि कांदा पिकांवर त्यामुळे त्यांच्या खूप मोठा नकारात्मक परिणाम हा  होतो. आता कांदा चाळ बांधकामासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शासनाच्या वतीने   शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.  या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी mahadbt web portal या ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

कांदा चाळ योजना 

असा करा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज.

ऑनलाईन प्रकीर्या  कांदा चाळ योजना खालील प्रमाणे आहे. खालील दिलेल्या पद्धतीने तुम्ही तुमचा कांदा चाळ या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हा करू शकता.

सर्वात प्रथम तुम्हाला गुगलच्या सर्च बारमध्ये mahadbt farmer login असा कीवर्ड टाकून  सर्च करा.

त्यांनतर तुमच्या समोर महाडीबीटी शेतकरी वेब पोर्टल हे उघडेल  होईल.

तेथे तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे .

जर तुम्ही नवीन असाल आणि तुमच्याकडे mahadbt web पोर्टलचा शेतकरी लॉगीन पासवर्ड  आणि आयडी नसेल तर मग तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी म्हणजेच त्यामध्ये रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.

नवीन नोंदणी कशी करावी तुम्हाला जर माहित नसेल  तर येथे क्लिक करा.




त्यांनतर लॉगीन झाल्यावर अर्ज करा या बटनावर क्लिक करा.

त्यामध्ये फलोत्पादन या पर्याया समोरील बाबी निवडा व या बटनावर क्लिक करा.

त्यांनतर ऑनलाइन अर्ज  फलोत्पादन योजनेचा तुमच्या समोर दिसेल. तुम्हाला त्या  ठिकाणी  घटक प्रकार या पर्यायासाठी इतर घटक पर्याय निवडायचा आहे.

बाब या पर्यायखाली असलेल्या चौकटीवर क्लिक करून कांदा चाळ हे पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.

आणि त्यामध्ये सर्वात शेवटी जेवढ्या मेट्रिक टन क्षमतेचे कांदा चाळ हे तुम्हाला हवे असेल ती क्षमता समोर  दिलेल्या यादीमधून निवडा.

तुम्ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा.

प्राधान्यक्रमांक योजनेसाठी  निवडा आणि अर्ज सादर या बटनावर क्लिक करा.

तुम्ही जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर जसे हि तुम्ही अर्ज सादर कराल त्यावेळी ३० रुपयापर्यंत शुल्क तुम्हाला द्यावे तेथे लागेल आणि जर तुम्ही याआधी इतर कोणत्याही योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला तेथे कुठल्याही प्रकारचे  शुल्क आकारले जाणार नाहीत. 

Top Posts

महाराष्ट्रातील नवीन पिक नुकसान भरपाई आणि ₹३१,६२८ कोटींनी भरीव मदत योजनेचा सविस्तर आढावा

अधिक वाचा

ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र 2025: संपूर्ण माहिती, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा

७५% अनुदानासह महाराष्ट्रातील भटक्या जमातींना मोठा फायदा – कुक्कुटपालनातून मिळवा नवे रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य!

अधिक वाचा

लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करावी? | Ladki Bahin Yojana eKYC Process 2025

अधिक वाचा

नवीन GST नियम 2025 | Navin GST Rules आणि त्याचे फायदे | GST 2.0 अपडेट्स

अधिक वाचा