कर्जाची पूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचा लाभ •बँक खात्याशी आधार जोडणी आवश्यक

बँक खात्याशी आधार जोडणी आवश्यक

Farmer

पुणे : कर्जाच्या वेळेत आणि पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याची प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली असून १ ते ५ सप्टेंबर दरम्यान पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांचे त्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी  जोडणे  गरजेचे आहे.शेतकऱ्यांना ते जोडल्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभ देण्यास सुरुवात ही होणार आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षांत पूर्ण कर्ज परतफेड करणाऱ्या. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. हा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

>

शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची ठरलेल्या मुदतीत परतफेड केली आहे, अशांना जास्तीत जास्त रुपये ५० हजारांपर्यंत. प्रोत्साहनपर रक्कम लाभ देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी २०१८ १९ किंवा २०१९-२० या वर्षांत घेतलेले कर्ज ५० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यांना कर्जाच्या

मुद्दलाइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी हा लाभ घेण्यासाठी बचत खात्याला आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे. आधार कार्ड नसलेल्या अशा पात्र शेतकऱ्यांनी तत्काळ ‘आपले सरकार सेवा’ केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड काढावे व ते आपल्या बँकेच्या बचत खात्यास जोडणी करावे. तसेच आधार कार्ड बचत खात्यास जोडलेले नसल्यास त्यांनीही बँकेशी संपर्क साधून आधार जोडावे, असे आवाहन ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मिलिंद सोबले यांनी केले आहे.

शासकीय लेखा परीक्षकांकडून कर्ज देणाऱ्या सर्व संस्थांकडून आणि कर्ज देणाऱ्या बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती तपासण्याचे काम  केले जात आहे. दिनांक १ ते ५ सप्टेंबर दरम्यान ही तपासलेली माहिती या योजनेच्या पोर्टलवर टाकली जाणार आहे. लेखापरीक्षकांची संख्या शेतकऱ्यांच्या संख्येनुसार  वाढविण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी  कोणत्याही दोन वर्षांत कर्ज पूर्ण  परतफेड केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.

– मिलिंद सोबले, जिल्हा उपनिबंधक, पुणे ग्रामीण

Top Posts

महाराष्ट्रातील नवीन पिक नुकसान भरपाई आणि ₹३१,६२८ कोटींनी भरीव मदत योजनेचा सविस्तर आढावा

अधिक वाचा

ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र 2025: संपूर्ण माहिती, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिक वाचा

७५% अनुदानासह महाराष्ट्रातील भटक्या जमातींना मोठा फायदा – कुक्कुटपालनातून मिळवा नवे रोजगार आणि आर्थिक स्वातंत्र्य!

अधिक वाचा

लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करावी? | Ladki Bahin Yojana eKYC Process 2025

अधिक वाचा

नवीन GST नियम 2025 | Navin GST Rules आणि त्याचे फायदे | GST 2.0 अपडेट्स

अधिक वाचा