mukhyamantri ladaki bahin yojana hapta : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आता काही कठोर निकष लागू करण्यात आले आहेत. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता तपासण्यासाठी बहिणींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, चारचाकी वाहन, पाच एकरपेक्षा अधिक जमिनीसंबंधी नियम, इतर शासकीय योजनांचे लाभार्थी असल्यास आणि एकाच कुटुंबातील दोन किंवा अधिक महिलांनी अर्ज केला आहे, का याची पडताळणी केली जाईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (ladaki bahin २१००) योजनेसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती, पण तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे अडीच कोटी अर्जांची पडताळणी करणे शक्य झालं नाही. त्यामुळे या योजनेसाठी अर्जदारांची फेरपडताळणी केली जाणार आहे, आणि पात्र लाभार्थींना १ एप्रिल २०२४ पासून दरमहा २१०० रुपये मिळतील, असं सांगण्यात येत आहे.
दरवर्षी लागू शकतो ५६ हजार कोटींचा निधी
सोलापूर जिल्ह्यातील पावणेअकरा लाख महिलांसह राज्यभरातून दोन कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केला आहे. यावेळी एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे की, प्रगत राज्यात एकाच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी कसे असू शकते? त्यामुळे अर्जांची फेरपडताळणी करून योग्य लाभार्थ्यांना योजना मिळवून देण्याची प्रक्रिया सुरु केली जात आहे.
निकषांची वेळेअभावी होवू शकली नाही पडताळणी
योजना लागू करण्यासाठी सरकारला दरवर्षी सुमारे ५६ हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. राज्याच्या एकूण उत्पन्न आणि खर्चाच्या मागणीवर आधारित, सरकारला योजनेसाठी एवढा मोठा निधी खर्च करण्याची स्थिती नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनाच योजना मिळवून देण्याच्या हेतूने योजनेसाठी फेरपडताळणी केली जाईल.