crop insurence - उर्वरित २०२३ च्या खरीप हंगामातील पीक विमा हा नाशिकसह ६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा – कृषिमंत्री धनंजय मुंडे


खरीप हंगामातील  पीक विमा



उर्वरित २०२३ च्या खरीप हंगामातील  पीक विमा हा नाशिकसह ६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा – कृषिमंत्री धनंजय मुंडे


नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी २०२३ चा उर्वरित पीक विमा हा कोणत्या जिल्ह्यासाठी आणि कोण कोणाला मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती हि पाहणार आहोत.

बळीराज्याच्या मदतीसाठी शासन हे नेहमीच कोणत्या न कोणत्या योजना ह्या घेऊन येत असते , आणि त्यामधीलच पीक विमा योजना ( crop insurrence ) हि एक योजना आहे. ज्या मुळे शेतकऱ्याच्या पिकाची नुकसान झाल्यास त्याचा मोबदला या योजनेकडून मिळतो. 


'पीक योजने’अंतर्गत खरीप हंगाम २०२३ मधील झालेल्या शेतकऱ्याच्या अधिकच्या नुकसान भरपाई पोटी राज्य शासनाने पीक विम्याची रक्कम हि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी हि मान्यता दिली आहे. आणि त्यामुळे नाशिक, जळगावसह अजून सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई  १९२७ कोटी रुपये हे लवकरच मिळतील, अशी माहिती मा. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

पीक विमा योजना महाराषट्र राज्यात बीड पॅटर्न वर आधारित राबविण्यात येते. म्हणजेच ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या ११०% पेक्षा जास्त नुकसान भरपाई हि आलेली आहे आणि त्या ठिकाणी ११०% पर्यंत विमा हा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान हे भरपाई राज्य शासन देते.

या तत्त्वानुसार खरीप हंगाम २०२३ मधील पीक विमा मंजूर ७,६२१/- कोटी रुपये या पैकी विमा कंपनी मार्फत ५४६९/- कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आले आहे.


तर उर्वरित शिल्लक नुकसान हे भरपाई पैकी १९२७ कोटी रुपये ची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होती. आणि ही मंजूर रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता हि दिली असून याबाबत ३० सप्टेंबर २०२४ रोजी शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे.

ही रक्कम ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने हि जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती राज्य कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी दिली. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित  पवार यांचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आभार देखील मानले आहेत.

या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ–

नाशिक रु.६५६/- कोटी,

जळगाव ₹४७०/- कोटी,

सातारा ₹२७.७३ कोटी,

चंद्रपूर ₹ ५८.९० कोटी,

अहमदनगर ₹ ७१३/- कोटी,

सोलापूर ₹२.६६ कोटी


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad