₹ 20 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार, नवीन शेतकऱ्यांची पात्रता यादी आणि नवीन GR तपासा -
E-पीक पाहणी न्यूज | e-peek pahani
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर हि आली आहे. शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्याच्या अंतर्गत सोयाबीन व कापूस पिकांच्या नोंदी असलेल्या अश्या शेतकऱ्यांना ₹20,000 अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹20,000 अनुदान जमा होणार आहे.
शासनाने सध्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विविध योजना ह्या सुरू केल्या आहेत. यामध्ये प्रति हेक्टर ₹5,000 अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती, ज्यामुळे बरेच शेतकऱ्यांचे खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी करूनही सातबारावर सोयाबीन पिकांची नोंद नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अनुदान यादीत नाव आलेले नाही, त्यांनी तक्रारी केल्या आहेत. यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहणी नोंदणीच्या अटी रद्द करण्याची विनंती केली आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 20 हजार रुपये
त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की, ई-पीक पाहणीची अट कायम राहील. यानुसार, ई-पीक पाहणी न केल्यास शेतकऱ्यांना अनुदानासाठी अपात्र ठरवले जाईल. 2024 च्या खरीप हंगामात सोयाबीन व कापसाचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे, त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ही योजना राबवली आहे.
राज्य सरकारने 2023 च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी नोंदी असलेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ₹1,000 अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, तर 0.2 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर ₹5,000 अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादित देण्याची योजना आहे. पण कार्यपद्धती स्पष्ट नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.