Apply CM Mahayojanadoot Scheme - मुख्यमंत्री योजनादूत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

Apply CM Yojanadut Schem


मुख्यमंत्री योजनादूत या योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया हि सुरु झाली आहे. या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. आपण योजना दूत यासाठी अर्ज हा करू शकता.


आपण महाराष्ट्रात राहत असाल आणि जर तुम्ही तुमच्याकडे कुठलाही जॉब किंवा नोकरी नसेल तर तुम्हाला योजनादूत होण्याची चांगली संधी मिळाली आहे. योजनादूतसाठी ऑनलाईन अर्ज सुरू हे झाले आहेत. आणि  यामध्ये सहभागी होऊन शासकीय योजनांबद्दल माहिती देण्याची संधी हि तुम्हाला मिळणार आहे.



योजनादूत बद्दल माहिती. 

राज्यातच्या प्रत्येक गावातून १ व्यक्ती हि या योजनासाठी शासनाकडून निवडली जाईल. महाराष्ट्रात मध्ये एकूण ५० हजार योजनादूतांची निवड हि केली जाईल.


योजना दूतांना प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये एवढे मानधन हे शासनाकडून दिले जाईल. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख हि १५ सप्टेंबर २०२४ आहे. तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज हा सादर करा.


योजना दूतांचे मानधन व कामकाजाची माहिती:


योजना दूतांना महिन्याला १० हजार रुपये मानधन हे सरकारकडून मिळेल. तुम्हाला शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती हि लोकांपर्यंत पोहचवावी लागेल. आणि महत्वाचे म्हणजे ही नोकरी फक्त ६ महिनेच आहे, आणि त्यानंतर मानधन हे मिळणार नाही. कामकाजाचा प्रमाणपत्र हे सर्व योजनादूत यांना मिळेल, ज्याचा भविष्यात तुम्हाला खाजगी कंपन्यांमध्ये हि उपयोग होऊ शकतो.


योजनादूत यासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

Mukhyamantri Yojanadoot


  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • पदवी असल्याचे प्रमाणपत्र
  • संगणक प्रमाणपत्र (MSCIT) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे वय १८ ते ३५ दरम्यान असावे



बेरोजगार तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. योजनादूत म्हणून काम करतांना तुम्हाला शासकीय योजनांची माहिती हि लोकांपर्यंत पोहचवावी लागेल. दर महिन्याच्या किमान २० दिवस काम केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात मानधन हे जमा केले जाईल. तुम्ही पगार मिळवण्यासाठी आधार लिंक केलेले बँक खाते हे असणे आवश्यक आहे.


मुख्यमंत्री योजनादूत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.


अर्ज करतांना काही अडचण आल्यास, info@mahayojanadoot.in या इमेलवर संपर्क करून मदत मिळवू शकता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad