तीन गॅस सिलेंडर मोफत - मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: राज्यातील महिलांना मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत - cm annapurna scheme

 मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: राज्यातील महिलांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत

Mukyamantri Annapurna Yojana
Mukhyamantri Annapurna Yojana


केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना आणि मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वर्षाला 3 गॅस सिलिंडरचे हे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


Mukhyamantri Annapurna Yojana - योजनेचे पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत :

 या योजनेचा लाभ  मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे हे आवश्यक आहे. राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सर्व लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

आणि मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सुद्धा या योजनेस पात्र असणार आहे. एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी हा या योजनेस पात्र असेल. तसेच फक्त 14.2 किलेग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी हि असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल.

या योजनेची कार्यपद्धती हि पुढील प्रमाणे आहे.

 प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे नियमित वितरण हे तेल आणि पेट्रोलियम कंपन्यांमार्फत करण्यात येते. “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” ह्या अंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत गॅस सिलिंडलचे वितरणही तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल.आणि केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदाना व्यतिरिक्त राज्य शासन 530 रुपये प्रति सिलिंडर इतकी रक्कम हि लाभार्थ्यांचा थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी हे यांना प्रति सिलिंडर 830 रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.  या योजनेत  प्रत्येक ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलिंडरसाठी अनुदान हे देण्यात येणार नाही. आणि दि.1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल. दि.1 जुलै 2024 नंतर विभक्त झालेल्या शिधापत्रिका (ration card )या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी आणि लाभार्थी निवडीसाठी मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी एक, प्रत्येक जिल्ह्यासाठी आणि जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहरासाठी नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली हि समिती असेल, तर संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत असेल. व या दोन्ही समिती ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांचे (रेशन कार्डनुसार) कुटुंब हे निश्चित करेल. आणि योजनेतील लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याची काळजी पण येथे घेईल. या सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित हि अंतिम यादी, आधार संलग्न बँकखाते क्रमांकासह निश्चित करेल. याशिवाय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी आणि  ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी राज्यस्तरीय समितीही कार्यरत असणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad