मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (ladakibahin.maharashtra.gov.in login ) योजनेचा लाभ घेण्यासाठी २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांनी आपला अर्ज आजच महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल- मोबाईल ॲप- सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरा

 राज्यातील महिलांसाठी…‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’


mazi ladki bahin scheme
mazi ladki bahin scheme online arj




ladakihanin yojana official portal - maharashtra goverments ladakibahin.maharashtra.gov.in

महाराष्ट्र राज्यातील  माता-भगिनी ह्या आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील महिलांच्या आरोग्य आणि पोषणाची हमी  हि घेणार आहे.

राज्यामधील महिला आणि  मुलींना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर रोजगार निर्मितीस चालना देणे, आणि महिलांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन हे करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे, महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे या योजनेचा हा मुख्य उद्देश आहे.

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.



या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र असलेल्या महिलेच्या  स्वत:च्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer  DBTDirect Benefit Transfer  DBT) संबद्धीत बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रूपये हे दिले जाणार आहे. आणि त्यांच्याद्वारे केंद/राज्य शासनाच्या अजून आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1,500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर त्या फरकाची रक्कम हि या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात हि येणार आहे. याचाच अर्थ त्या महिलेला 1 वर्षात 18 हजार रूपये हे शासनाकडून मिळणार आहेत. ladakibahin.maharashtra.gov.in login


 mazi ladki bahin yojana maharashtra या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अनेक महिलांना घेता यावा यादृष्टीने आपल्या सरकारने अनेक अटी ह्या कमी करत या योजनेची प्रक्रिया हि अजून च  सुलभ केली आहे.या योजनेअंतर्गत आता 21 ते 65 या वयोगटातील विवाहित, घटस्फोटित,विधवा,  परित्यक्त्या व निराधार या महिलांना तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दरमहा  हे 1,500 रुपये दिले जाणार आहेत. यामुळे  राज्यामधील अनेक महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येईल.



"माझी लाडकी बहीण" योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. ज्याठिकाणी  अशक्य आहे, तिथे ऑफलाईन अंगणवाडी सेविका व सेतू सुविधा केंद्रात अर्ज हा जमा करता येईल. आणि घरच्या घरी  मोबाईलवरुनही आपण नारीशक्तीदूत ह्या राज्यसरकारच्या अँपवरून ऑनलाईन अर्ज भरता येईल.


"माझी लाडकी बहीण" योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता :-


  •  २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांना लाभ
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक  उत्पन्न 2.50 लाख  रूपयांपेक्षा जास्त  नसावे
  •  लाभार्थी  महिला महाराष्ट्राच्या रहिवासी असणे  आवश्यक.
  • पिवळे व  केशरी   रेशनकार्ड असल्यास उत्पन्न दाखला  प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.
  • लाभार्थी महिलेच्या बँक  खाते असणे  आवश्यक .
  • विवाहित,विधवा, घटस्फोटीत,परितक्त्या, निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेला लाभ.


"माझी लाडकी बहीण"  ladkibahin.maharashtra.gov.in योजनेचा लाभ  मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र  हे नसल्यास 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पण याठिकाणी चालणार आहे , मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी  ग्राह्य हे  धरण्यात येणार आहे.

आणि परराज्यात  जन्म  झालेल्या महिलांनी महाराष्ट्रराज्यातील  पुरुषाबरोबर विवाह  केला असल्यास पतीचा  जन्मदाखला हा याठिकाणी लागणार आहे, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र वा  अधिवास प्रमाणपत्र हे  ग्राह्य धरण्यात  येणार आहे.


 "माझी लाडकी बहीण"  या  योजनेचा लाभ  मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-



योजनेच्या  लाभासाठी ऑनलाईन अर्ज.

  1. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
  2. पासपोर्ट  साईजचा फोटो.
  3. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्रातील जन्मदाखला
  4. रेशन कार्ड
  5. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पनाचा  दाखला.
  6. बॅक खाते पासबुकच्या पहिल्या   पानाची छायांकित प्रत.



 "माझी लाडकी बहीण" या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.


या योजनेत अर्ज कसा करता येईल ?


  • अश्या   महिलेस  ऑनलाईन अर्ज करता येत नसेल,तर  त्याच्यासाठी अर्ज  भरण्याची प्रक्रिया अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी किंवा कार्यालये/ग्रामपंचायत/वॉर्ड/सेतू सुविधा केंद्रे येथे सुविधा उपलब्ध आहे.
  • अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका/सेतू सुविधा केंद्र/मुख्यसेविका/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/ वार्ड अधिकारी  यांनी  ऑनलाईन प्रस्तावित केल्यावर लाभार्थी महिलेचा अर्ज हा सक्षम  अधिकारी यांच्याकडे सादर करता येईल
  •  "माझी लाडकी बहीण" योजनेची अर्ज करण्याची  प्रक्रिया  विनामूल्य आहे.
  • अर्जदार  महिलेने  स्वत:  अर्ज  हा करताना उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून त्या महिलेचा थेट फोटो  काढता येईल आणि ई-केवायसी हि करता येईल.


महाराष्ट्रामधील आर्थिक दुर्बल घटकांसोबत सर्व प्रवर्गातील महिलांसाठी राज्य सरकार पाठीशी उभे आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात असून महिलांना आर्थिक आधार हा देण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad