36 हजारापर्यंत नुकसानभरपाई मिळणार सरकारकडून परिपत्रक जारी. - maha agri maharashtra shetkari schemes
pik nuksan bharpayi 2024 anudan ( marathi corner) : 36 हजारापर्यंत मिळणार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पहा सविस्तर माहिती
मागच्या वर्षाला म्हणजेच २०२३ या वर्षातील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात अवकाळी पाऊस व मोठ्या प्रमाणत गारपीट हि झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणमध्ये नुकसान झाले होते.
यामुळे राज्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका बसलेल्या अश्या बाधित शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत हि दिली जाणार आहे.
अश्या प्रकारे मिळणार नुकसान भरपाई ची रक्कम :
जिरायतीसाठी हेक्टरी 13600 रुपये तर बागायतीसाठी हेक्टर 27 हजार रुपये असें आणि तब्बल 36 हजार रुपये हे बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी मदत करण्याचे निर्देश हे महसूल व वन विभागाच्या वन विभागाने परिपत्रकाद्वारे सर्वत्र जारी केले आहे.
सरकारच्या या अश्या निर्णयामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा मिळणार आहे.
ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हे झाले या नुकसानीचा आढावा घेऊन मदत हि देण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये २०२३ या वर्षामध्ये राज्य शासनाने घेतला होता.
शासन देणार निकषा बाहेर जाऊन मदत 36 हजारापर्यंत नुकसानभरपाई मिळणार .
नुकसानग्रस्त अश्या शेतकऱ्यांना निकषा-बाहेर जाणून शासन हि मदत देण्यात येणार आहे. या निर्णयाचे अंमलबजावणी न केल्याने शेतकऱ्यांनी सरकार विरोधात रोष हा व्यक्त केला होता. राज्याच्या अनेक भागामध्ये शेतकरी बांधव हे रस्त्यावर देखील उतरले होते.
राज्य शासनाने तातडीने याची दखल घेत नुकसानग्रस्त अश्या शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्याचे निर्देश हे दिले आहेत.
अशी मिळेल मदत
एचडी आर एफच्या ( HDRF महाराष्ट्र ) निकषानुसार यापूर्वी शेतकरी बांधवाना 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत हि दिली जात होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे मदतीचे प्रमाण 3 एकरच्या मर्यादेत वाढवण्यात आले.
त्यानंतर राज्यामध्ये सत्तेत आलेल्या महायुती सरकारने देखील याच निर्णयाच्या धर्तीवर जिरायती शेतीसाठी 8 हजार पाचशे रुपये या ऐवजी 13500 रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी 17 हजार रुपयां ऐवजी 27 हजार रुपये व बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 22 हजार 500 रूपयां ऐवजी आता 36 हजार रुपयांची मदत हि शवतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
conclusion :
हि बातमी महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे महू अशा करतो कि हि माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त असेल.