Soyabeen seed cultivation एकरी 20- 25 क्विंटल होईल सोयाबीनचे उत्पादन, असे करा नियोजन पंजाबराव डख यांचे मार्गदर्शन...!!

 Soyabeen seed cultivation एकरी 20- 25 क्विंटल होईल सोयाबीनचे उत्पादन, असे करा नियोजन पंजाबराव डख यांचे मार्गदर्शन...!! - maha krushi

Soyabeen seed cultivation-method


पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा

Soyabeen seed Cultivation Method : एका एकरात 20 ते 25 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवण्यासाठी असे करा सोयाबीन पिकाचे नियोजन..

Soyabeen seed  cultivation शेतकरी मित्रांनो उन्हाळा हा जवळ संपला असून पावसाळ्याला सुरुवातच झाली आहे. बरेच शेतकरी मित्र सोयाबीन पिकाची लागवड हि करतात परंतु योग्य पद्धतीचे त्याचे नियोजन नसल्या कारण त्यांना 10 दहा ते 15 क्विंटल उत्पादनावरच आपले समाधान हे मानावे लागते. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे उत्पादन जास्तीत जास्त कशा पद्धतीने घेता यावे यासाठी पंजाबराव डक यांनी सोयाबीन उत्पादक  सविस्तर मार्गदर्शन केले आहे. याची संपूर्ण माहिती आज आपण या पोस्टच्या माध्यमातून आपल्याला पाहणार आहोत.


सोयाबीनची पेरणी विरळ पद्धतीने करावी.. { agriculture news marathi }

बऱ्याच  शेतकऱ्यांना वाटते कि सोयाबीनची पेरणी दाट केल्यास त्यांना चांगले उत्पादन हे मिळवता येते परंतु दाट पेरणी केल्यास सोयाबीन पिकामध्ये हवा हि खेळती राहत नाही त्या परिणामी जास्त शेंगा ह्या झाडाला लागत नाहीत आणि त्या मध्ये उत्पादन हे कमी होते. दाट पेरणी झाल्यामुळे पीक हे उंच वाढते उंच वाढलेल्या पिकाला शेंगा ह्या कमी लागतात.

त्यासाठी सोयाबीनची पेरणी हि करताना टोकन पद्धतीने लागवड केल्यास त्याचा चांगला फायदा हा शेतकऱ्याला होतो शक्य असल्यास , शेतकरी बांधवांनी टोकण यंत्राच्या साह्यानेच शेतीमध्ये सोयाबीनची लागवड हि करावी म्हणजे जेणेकरून वे विरळ लागवड होईल व व्यवस्थित रित्या सोयाबीनच्या पिकांची वाढ झाल्यामुळे चांगल्या शेंगा देखील लागून निश्चितच उत्पादन वाढेल.


सोयाबीन हे पेरणी पूर्वी आणि पेरणीनंतर खत व्यवस्थापन कसे करावे - पंजाबराव डख.

पंजाबराव डख म्हणतात की शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी अगोदर एक खताचा डोस हा दिला पाहिजे आणि सोयाबीनची चांगली उगवण झाल्यावर त्याच्या झाडाची व्यवस्थित वाढ हि  झाल्यानंतर 1 ते सव्वा महिन्यानंतर परत एक डोस हा द्यावा जेणेकरून योग्य वेळी रोज दिल्यास सोयाबीनला याचा फायदा पण होईल.

सोयाबीन पिकाला त्याच्या काढणीपर्यंत जास्तीत जास्त दोन हे डोस देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खताला जास्त प्राधान्य दिल्यास सोयाबीनच्या उत्पादनात 100% टक्के हि वाढ होते.


शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या योग्य वाणाची निवड करणे देखील महत्त्वाचे आहे – पंजाबराव डक

सर्वात महत्त्वाचा घटक सोयाबीन उत्पादनात ते म्हणजे योग्य वाणाची निवड. योग्य त्या वानाची निवड केल्यास रोग प्रतिकारक क्षमता असलेले वान हे निवडल्यामुळे त्या कमी रोग पडल्यास त्याच्या उत्पादन वाढीस मदत होते. त्याच प्रमाणे पावसाळ्याच्या दिवसात ज्या वाणाच्या शेंगा कमी फुटतात असे वाण हे निवडावे जसे की 612 या वानाच दाणे हे टपोरे असल्यामुळे या soyabin वानाच्या शेंगा ह्या फुटत नाहीत आणि त्यामुळे उत्पादन चांगले मिळू शकते.

शेतकऱ्यांनी अलीकडे दिलेल्या माहितीनुसार राहुरी विद्यापीठाचे फुले संगम व फुले किमया हे या दोन जातींनी शेतकऱ्यांना चांगले उत्पादन हे मिळून दिले आहे. फुले संगम आणि फुले किमया या वाणापासून मागील काही वर्षांमध्ये जवळजवळ एकरी 15 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पादन हे शेतकऱ्यांनी मिळवलेले आहे.

Soyabeen seed बेड पद्धतीने करा लागवड :- पंजाबराव डक

शेतकरी मित्रांनो जर आपण टोकन पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड करणार असाल तर पेरणीच्या आधी जमिनीची मशागत करून खत टाकून घ्या. जर बेड पद्धतीने लागवड केल्यास दोन्ही बाजूने हे लागवड करता येते व पिकाला व्यवस्थित रित्या पाणी असेल तर पाणी देखील आपल्याला देता येते यामुळे पावसाचा ताण बसल्यास कमी होते आणि चांगल्या प्रकारच्या शेंगा ह्या लागून उत्पादन वाढते.

आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नसेल त्यांनी जर बेड पद्धतीने लागवड केली तर बाजूच्या सऱ्यामध्ये पावसाचे पाणी हे साचून जास्त दिवस ओलावा हा टिकून राहतो. परंतु ज्यांच्या शेतामध्ये पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही किंवा पाणथळी जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांनी बेड पद्धतीने वापर करू नये.


योग्य वेळी तण व्यवस्थापन :-

15 दिवसानंतर  म्हणजेच सोयाबीन ऊगुन आल्यानंतर एक वेळा खुरपणी हे करणे गरजेचे आहे. यामुळे तन निघल्यानंतर सोयाबीन पिकाला योग्य प्रमाणात पुरेशी हे घटक मिळतात. व  जमीन देखील भुशबुशीत झाल्यामुळे चांगल्या प्रकारे उत्पन्न हे वाढीस मदत होते.

शेतकरी अलीकडच्या काळात तन  नाशकाचा वापर हा करतात यामुळे तन हे जळून जाते, पण कधी कधी जोराचा पाऊस झाल्यामुळे जमिनीत निबरपणा हा येतो अशावेळी खुरपणी/कोळपणी हि करणे देखील गरजेचे आहे.Soyabeen सीड



Conclusion :-

Soyabeen seed Cultivation Method : एका एकरात 20 ते 25 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवण्यासाठी असे करा सोयाबीन पिकाचे नियोजन..सोयाबीन हे पेरणी पूर्वी आणि पेरणीनंतर खत व्यवस्थापन कसे करावे - पंजाबराव डख.Soyabeen seed बेड पद्धतीने करा लागवड :- पंजाबराव डक.योग्य वेळी तण व्यवस्थापन :-


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad