अश्या तीन टप्प्यांत 50,000 प्रोत्साहन अनुदान आपल्या खात्यात जमा होणार |
50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra 2022
50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra – नमस्कार शेतकरी बंधूंनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी या योजनेअंतर्गत 50000 प्रोत्साहन अनुदान या कर्जमाफीच्या याद्या csc center वर प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्यासाठीच्या केवायसी प्रक्रियेला सुरुवात हि झालेली आहे,आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच येत्या काही दिवसांमध्ये ५० हजार प्रोत्साहन पर अनुदान हे तीन टप्प्यात हे जमा होणार आहे. व त्याच संदर्भात अत्यंत हत्त्वाची अशी अपडेट आपल्यासाठी या लेखामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल , त्या मुळे हि माहिती सविस्तर वाचा.
चार हजार कोटी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हि वितरित होणार.
तीन टप्प्यांत प्रोत्साहन अनुदान.
राज्यामधील 23.14 लाख शेतकरी हे नियमित कर्जदार [ Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra ] आहेत. व त्यांना तीन टप्प्यांत हे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. आतापर्यंत 8 लाख 29 हजार शेतकऱ्यांची हि पहिली यादी शासनाकडून प्रसिद्ध झाली आहे.
50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra
तसेच त्यासाठीचे आधार प्रमाणीकरण सुद्धा शासनाने चालू केले आहे . ते दोन दिवसांत आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर अश्या शेतकऱ्यांना अनुदान रक्कम 18 ऑक्टोबरला वितरित हि केली जाईल.सध्या १८ जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणूका ह्या चालू असल्यामुळे तेथील जवळपास 14 लाख 85 हजार या शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये अनुदान हे मिळणार आहे.
शेतकरी मित्रांनो 2017-18 , 18 -19 आणि 19-20 या आर्थिक वर्षापैकी किमान दोन वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे आपल्या पीक कर्जाचे परतफेड हि केली होती अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत अनुदान हे राज्य सरकार कडून मिळणार आहे. ही रक्कम संबंधित बँकांनी कर्जापोटी वर्ग करून घेऊ नये यासाठी शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये ही रक्कम जी आहे ती वितरित केली जाणार आहे.
जवळपास 12 हजार कोटी रुपये हे शेतकरी बांधवाना मिळणार आहेत.तसेच अडचणीतील जिल्हा बँकांचीही थकबाकी हि कमी होण्यास मदत हि होणार आहे.राज्यातील कोल्हापूर, सांगली, पुणे, नगर, 12 सोलापूर या जिल्हा बँकांना सर्वाधिक रक्कम हि मिळणार आहे.{ Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra }
marathi corner
प्रोत्साहनपर ५० हजार अनुदान टप्यानुसार माहिती.
◈ योजनेचा पहिला टप्पा
4,000 कोटी रुपये 8.29 लाख शेतकरी.
◈ योजनेचा दुसरा टप्पा
5,000 कोटी रुपये 10 लाख शेतकरी.
◈ योजनेचा तिसरा टप्पा
1,200 कोटी रुपये 4.85 लाख शेतकरी.
हि सर्व अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वीच..
या वर्षी अनेक जिल्ह्यांत सतत पाऊस, अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. राज्यातील जवळपास 21 जिल्ह्यांना याचा सर्वाधिक फटका हा बसला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून शासनाने चार हजार कोटी रुपये हे दिले आहेत.
त्यामध्ये 65 मिलिमीटरपेक्षा जास्त आणि सततचा पण 65 मिलि-मीटरपेक्षा कमी पाऊस झालेला आहे . शेतकऱ्यांचे नुकसान हे झाले, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हि दिली जात आहे. हि रक्कम सुद्धा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा होणार आहे.
मित्रांना शेअर करा: