Mahila kisan yojana list असा मिळतो महिला किसान योजना तुन 50 हजार चा लाभ . -

 Mahila kisan yojana list असा मिळतो महिला किसान योजना चा लाभ. -

Mahila kisan yojana list


सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते त्यात काही योजना ह्या केंद्र सरकार कडून चालवल्या जातात व काही योजना ह्या राज्य सरकार कडून राबवल्या जातात त्या मधील पीएम किसान योजना आणि सीएम किसान योजना या दोन्ही योजने संदर्भात माहिती तुम्हाला तर असेलच. परंतु तुम्हाला mahila kisan yojana महिला किसान योजना संदर्भात जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही या लेखातून जाणून घ्या या योजनेचा लाभ हा कसा दिला जातो.

ज्या अनुसूचित जाती समाजातील  महिला आहेत अशा महिलांना या महिला किसान योजना अंतर्गत योजनेचा लाभ दिला जातो. ज्या उपजाती अनुसूचित जातीमधील आहेत जसे की ढोर, चर्मकार, होलार आणि मोची इत्यादी या प्रवर्गातील महिलांना या mahila kisan yojana चा लाभ दिला जातो.


 या महिला किसान योजनेचा उद्देश म्हणजेच Mahila kisan yojana वरील समाजाच्या महिलांचे जीवनमान उंचावे तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना मनाचे स्थान मिळावे हा आहे.

या महिला किसान योजनेसाठी पात्र केवळ अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील महिलाच असणार आहेत.


खालीलप्रमाणे या योजनेच्या अटी आहेत.

Mahila kisan yojana महिला किसान योजनेचा अटी 

या योजनेसाठी जी व्यक्ती अर्ज करणार आहे ती व्यक्ती हि चर्मकार समाजातीलच असावी लागते.

अर्जदार व्यक्ती हि महाराष्ट्रील रहिवासी असावी लागते .

अर्जदार व्यक्तीचे वय हे १८ ते ५० मध्ये असावे लागते.

अर्जदार व्यक्ती हि जो व्यवसाय करणार असेल त्या व्यवसायाचे पूर्ण ज्ञान हे त्या व्यक्तीस असणे गरजेचे आहे.

या योजनेसाठी ग्रामीण भागासाठी ९८००० आणि शहरी भागासाठी १२०००० एवढे उत्पन्न असणे गरजेचे आहे.

अर्जदाराचा तहसीलदार किंवा त्या समान सक्षम अधिकाऱ्याने अर्जदार व्यक्तीला दिलेला जातीचा दाखला.

यापूर्वी मंडळाच्या योजनांचा अर्जदाराने लाभ घेतलेला नसावा.

या योजनेच्या अटी आहेत वरील प्रमाणे  या अटींचे तुम्ही पालन करीत असाल तरच तुम्हाला या योजनांचा लाभ हा मिळणार आहे.

या महिला किसान योजनेचे स्वरूप.

महिलांना ५० हजार आर्थिक सहाय्यता महिला किसान योजनांतर्गत दिली जाते. यामध्ये पात्र व्यक्तीला १० हजार रुपये अनुदान स्वरूपात व ४० हजार रुपये हे ५ टक्के व्याजदराने या अंतर्गत दिले जाते.


लाभ घेण्यासाठी अर्जसार महिलेकसे शेती असणे गरजेचे आहे.

जर पतीच्या नावे शेतजमीन असेल तर त्याचे पतीचे प्रतिज्ञापत्र लागते.

फक्त शेती व्यवसायासाठीच या महिला किसान योजनांतर्गत  कर्ज हे दिले जाते.

अर्ज कोठे करावा?

या योजनेचा अर्ज हा ऑफलाइन स्वरूपात भरला जात असून संबधित जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयामध्ये अर्ज करावा.

 महिला किसान योजना mahila kisan yojana अर्ज संबधित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कार्यालयामध्ये जिल्ह्याच्या निशुल्क अर्ज हा मिळतो.


अर्जामध्ये व्यवस्थित माहिती भरून , अर्जदाराने विहित नमुन्यातील  हा अर्ज संबधित कागद-पत्रासह जिल्ह्याच्या कार्यलयामध्ये सादर करावा.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad