Loan Waiver : 50 हजार अनुदानासाठी हे शेतकरी असतील पात्र यांना मिळणार अनुदान शासन निर्णय आला
Loan Waiver ; शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे .कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन पार अनुदान देण्याचा निर्णय हा राज्य शासनाने घेतलेला आहे व त्या निर्णय बाबतचा शासन निर्णय सुद्धा प्रदर्शित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये Loan Waiver काही निकष व पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तरी त्यामध्ये आपण पात्र आहात ? की अपात्र हे जाणून घेऊया. या योजनेची अंमलबजावणी ही ऑनलाईन पद्धतीने च होणार आहे. त्याचा शासन निर्णय व त्याबद्दल ची इतर सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा व इतरांना देखील शेअर नक्की करा. Agriculture News.
वैयक्तिक शेतकरी हा निकष कर्जमुक्तीचा लाभ देत असताना त्या ठिकाणी गृहीत धरण्यात येईल. राज्य शासन निर्णय क्रमांकः Loan Waiver प्रोअयो ०६२२ /, प्र.क्र.७२/२-स, या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका,ग्रामीण बँका, खाजगी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सेवा संस्था सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) अल्पमुदत पीक कर्ज शेतकऱ्यांना दिलेले विचारात घेण्यात येईल Agriculture News
50 हजार प्रोत्साहन पात्र शेतकरी कोण:-
सदर योजनेस अतिवृष्टी व महापूरामुळे , नैसर्गिक आपत्ती मुळे सन २०१९ वर्षामध्ये राज्यात झालेल्या नुकसान, अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा या योजनेस पात्र असतील. तसेच जर एखादा शेतकरी मयत झाल्याआणि नन्तर त्यांच्या कर्जाची वारसांनी परतफेड केली असल्यास ते वारस सुद्धा या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
यांना लाभ मिळणार नाही
➥ आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार
➥ केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
➥ महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
➥ सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी
➥ २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्तीniyamit karj mafi anudan
शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती
शेतकऱ्यांना मिळणारा लाभ
➥ ३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज होणार माफ!
➥ कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार!
➥ राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार !
7057159437
ReplyDelete