मतदारकार्ड ला आधारकार्ड लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस

 मतदारकार्ड ला आधारकार्ड लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस - how to link voter card to adhar card  Online in Marathi - maha-agri.in



Linking of Aadhaar number with voter card

केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेद्वारा निवडणूक (सुधारणा) कायदा अधिनियम, २०२१ व भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार  प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून आधारची माहिती संग्रहीत आणि  मतदार याद्यातील तपशिलाशी जोडण्या-करिता या संबंधीच्या अपर मुख्य निवडणूक अधिकारी तथा मुख्य सचिव ,मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सूचना ह्या मिळालेल्या आहेत. ( adhar voter link )


प्रत्येक मतदाराकडून  मतदार यादीत असलेल्या आधार क्रमांक विहीत रितीने  व विहीत स्वरुपात मिळविण्यासाठी वैधानिकरित्या मतदार नोंदणी अधिकारी त्यांना प्राधिकृत करण्यात ( adhar voter link )आलेआहेत. त्याच प्रमाणे  अधिसूचना दिनांक 17 जून 2022 मध्ये निर्दिष्ट केलेल्या नुसार दिनांक 1 एप्रिल, 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी प्रत्येक व्यक्ती जो मतदार यादीत नाव असलेला  त्याचा आधार-क्रमांक हा अर्ज क्र. 6 ब मध्ये भरुन देऊ शकतो.

मतदारकार्डला आधारकार्ड लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस – How to link voter card to adhar card  Online:


मतदारकार्ड आधारकार्डशी ऑनलाईन लिंक करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या  nvsp.in  या वेबसाइट वर जायचे आहे.


खालील प्रमाणे स्टेप वापरून तुम्ही ( adhar voter link )ऑनलाईन मतदार कार्ड हे आधार कार्डशी लिंक करू शकयता:-


➥ तुम्ही प्रथम राज्य निवडणूक आयोगाच्या  nvsp.in  या वेबसाइट वर जायचे आहे.

➥ तेथे Login and Register यावरती क्लिक करायचे आहे.

➥ जर तुम्ही वेबसाईट वर रजिस्ट्रेशन केले नसेल तर तेथे Don’t have Account Register as  New User यावरती क्लिक करायचे आहे. 

➥ तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करायचे आहे.

➥ नंतर तेथे तुम्हाला तुमचा User Name and Password टाकायचा आहे. व खालील Captcha Code जश्याचा तसा भरायचा आहे.

NVSP पोर्टल तुम्ही लॉगिन केल्यावर “-Information of -Aadhaar Number by -Existing Electors” या दिलेल्या ऑप्शन वर क्लिक करा.


Information of -Aadhaar Number by -Existing Electors

या पर्यायावर क्लिक केल्या नन्तर

➥त्या ठिकाणी तुम्हाला विविध ऑनलाईन फॉर्म दिसतील त्यातील आपल्याला मतदारकार्ड आधारकार्डशी ऑनलाईन लिंक करण्यासाठी जो Form 6B आहे त्या वर क्लिक करा.

 ----किंवा तुम्हाला ऑफलाईन ( adhar voter link ) अर्ज करण्यासाठी PDF फाईल वर क्लिक करून डाउनलोड करा.


➥Form 6: अर्जाचा नमुना नवीन मतदारांसाठी .

➥Form 6A: परदेशातील मतदारांच्या नावांचा समावेश.

➥Form 6B: मतदार यादी प्रमाणीकरणाच्या उद्देशाने -आधार क्रमांकाच्या माहितीचे पत्र.

➥Form 7: विद्यमान मतदार यादीतील  /वगळण्यासाठीनावाचा प्रस्तावित आक्षेपासाठी मतदार अर्ज.

➥Form 8: निवासस्थान स्थलांतरित करणे/विद्यमान मतदार नोंदी दुरुस्त करणे/EPIC बदलणे/ यादीतील पीडब्ल्यूडीचे चिन्हांकन यासाठी मतदार अर्ज.

➥ या विविध फॉर्म पैकी तुम्ही Form 6B हा पर्याय निवडायचा आहे.

Form 6B

नियम २६ अ भारत निवडणूक आयोग, नियम २६ अ नुसार फॉर्म 6B मतदार यादी प्रमाणीकरणाच्या उद्देशासाठी आधार क्रमांकाच्या माहितीचे पत्राचे तपशील येईल. ( adhar voter link )

पुढे तुम्हाला राज्य आणि विधानसभा/संसदीय मतदारसंघ, यांची वैयक्तिक माहिती दिसेल.


➥त्या नन्तर  “I have Aadhaar Number” या वर क्लिक करा आणि तेथे आधार क्रमांक, ठिकाण, आणि दिलेला कॅप्चा टाकून Preview या वर क्लिक करा.


➥फॉर्म मध्ये भरलेला सर्व तपशील Preview वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल तो तपशील तपासून पहा आणि फॉर्म सबमिट या वर क्लीक करा.


➥Form 6B Preview


फॉर्म NVSP या पोर्टल वर फॉर्म सबमिट केल्या नंतर तुमचा फॉर्म संदर्भ आयडी हा मिळेल, त्याच आयडीने तुम्ही फॉर्म च्या अर्जाची स्थिती हि ट्रॅक करू शकता.



वरील लेख हा उपयोगाचा असल्यामुळे आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला जर लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.


आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!


शेअर करा:



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad