अर्ज नमुना वडिलोपार्जित असलेली जमीन वाटप :
वडिलोपार्जित असलेली जमिन नावावर करणे फक्त १०० रुपयांत, शेतजमीन खरेदी विक्री
फक्त 100 रुपयांत वडिलोपार्जित असलेली जमिन नावावर करणे
मार्च 23, २०२२ अर्ज नमुना वडिलोपार्जित असलेली जमीन वाटप , शेतजमीन खरेदी विक्री,
वडिलोपार्जित जमीन कुठलेही शुल्क नभरता आपल्या नावावर कशी करायाची
याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
तर शेतकरी मित्रांनो बहुतेक अनेक लोकांना वडिलोपार्जित असलेली आपल्या हक्काची जमीन अथवा इतर दुसरी संपत्ती स्वतःच्या नावावरती करायचे असते.
परंतु लोकांची यासाठी अडवणूक केली जाते व अनेक ठिकाणी पैसे घेऊन या प्रक्रिया राबविल्या जातात.शेतकरी मित्रांनो तीन पद्धती वडिलोपार्जित असलेली जमीन नावावर करण्याच्या आहेत.
१ ) १९६६ कलम महाराष्ट्र महसूल अधिनियम ८५ नुसार.
२ ) नोंदणीकृत दुय्यम निबंधका समोर वाटप करणे.
३ ) वाटपाचा दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून.
यामध्ये तिन्ही पद्धती पैकी पहिली पद्धत हि सर्वात सोपी आहे. या पहिल्या पद्धतीनुसार जर वडिलोपार्जित जमीन नावावर करायची असेल तर फक्त आणि फक्त 100 रुपयांध्ये मं जमीनीचे वाटप केले जाते.
शेतकरी मित्रांनो सातबारा उताऱ्यावर वारसदारांची नावे लावण्यासाठी किंवा वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपासाठी तुम्हाला कोर्टाची किंवा दुय्यम निबंधकाच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज भासत नाही.
तहसीलदारांकडे सर्वांच्या सहमतीने अर्ज केल्यास कोणतेही तुम्हाला शुल्क न भरता जमिनीचे कायदेशीर पणे तहसीलदारांची वाटप करण्याची जबाबदारी आहे.
कुटुंबातील एखाद्या जमिनीचे वाटप करण्यासाठी किंवा एखाद्या मयताच्या नावच्या जमिनीला वा सातबाऱ्याला त्याच्या वारसाची नावे लावण्यासाठीही हि सोप्पी पद्धती आहे.
महसूल संहिता 1966 च्या महाराष्ट्र जमीन कलम 85 नुसार सर्व वारसदारांची सहमती असेल तर ती वाटपासाठी जमीन किंवा तहसीलदारांकडे वारसदार म्हणून नोंद लावण्यासाठी चा अर्ज सादर करू शकतात.
जमीन वाटपासाठी लागणारी कागपत्रे व
जमीन वाटपासाठी अर्जाचा नमुना
जमीन वाटपासाठी कलम ८५ अंतर्गत नायब तहसीलदार यांच्याकडे करावयाचा अर्ज.
जमीन वाटपासाठी चा अर्ज,
अर्ज सादर केल्या नंतर तहसीलदार तहसीलदार सर्व वारसदारांना सर्वांची सहमती असल्याची एक नोटीस काढून खात्री करून घेईल.
आणि तहसीलदार त्या जमीन वाटपाचा चा आदेश काढतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्या साठी ची जी जबाबदारी असते ती तलाठ्यावर असते .
नव्याने कोणत्याही नोटिसा काढण्याची गरज तहसीलदार यांच्या आदेशानंतर तलाठ्याला नसते त्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक जमीन वाटपासाठी ८ अ किंवा वारसदार यांचे सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी 1966 च्या कलम 85 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तहसिलदारांकडे अर्ज करावेत.