बातमी तुमच्या कामाची! शेती विकत घेण्यासाठी सरकार कडून मिळणार 50 टक्के अनुदान,
असा घ्या लाभ
50 percent subsidy for the purchase of agriculture
50 percent subsidy for the purchase of agriculture
राज्य सरकारने सध्या भूमिहीन शेतमजूरांसाठी 2022 स्वाभिमान कर्मवीर दादासाहेब गायकवाड व सबलीकरण योजना चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतीसाठी याचा खूप जास्त फायदा होणार आहे. शासनाकडून या योजनेत अनुसूचित जाती/ जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना जमिनीची खरेदी करण्यासाठी 50 टक्के हि बिनव्याजी आणि 50 टक्के अनुदान स्वरूपात रक्कम दिली जाते. यामुळे ही योजना एक फायदेशीर ठरत आहे.
जमीन खरेदी करून यामध्ये शासनाकडून ती भूमिहीन अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांच्या पती-पत्नीच्या नावाने ती केली जाते. पण विधवा व परित्यक्त्या इत्यादी स्त्रियांच्या बाबतीत जमीन त्यांच्याच नावे केली जाते. यामध्ये भूमिहीन शेतमजूर दारिद्र्यरेषेखालील कुटूंबाला चार एकर हि कोरडवाहू शेत जमीन किंवा दोन एकर हि बागायती शेत जमीन उपलब्ध करून देण्यात येते.सरकार यासाठी मदत करणार आहे. काही अटी ह्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
50 percent subsidy for the purchase of agriculture
50 percent subsidy for the purchase of agriculture
लाभार्थ्याचे यामध्ये किमान वय १८ व जास्तीत जास्त वय ६० वर्षे हे सरकारने निश्चित केले आहे. अर्जदार हा दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा आणि अर्जदाराकडे शेतजमीन नसावी .
जे कर्ज ;=लाभार्थ्याला मिळणार आहे ते कर्ज हे बिनव्याजी अडणार आहे आणि त्या कर्जाची मुदत ही १० वर्षे असणार आहे. कर्ज मंजुरीच्या दोन वर्षांनंतर कर्जफेडीची सुरूवात ही सुरू होणार आहे. कर्जाची परतफेड लाभार्थ्यांच्या कुटूंबाने १० वर्षाच्या आत करणे आवश्यक आहे. जमीन स्वत: लाभधारकाने कसणे आवश्यक असून तसा करारनामा देणे आवश्यक आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
१.अर्जदाराचा पासफोर्ट आकाराचा फोटो.
२. अनुसूचित जाती या प्रवर्गातील अर्जदार असल्याबाबत जातीचे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले विहीत प्रमाणपत्र
३. रहिवाशी दाखला,
४. रेशन कार्ड झेरॉक्स,
५. आधार कार्ड झेरॉक्स,
६.निवडणूक कार्ड प्रत,
७.तहसीलदार यांनी निर्गमित केलेला भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत दाखला.
८. मागील वर्षाचा तहसीलचा उत्पन्नाचा दाखला,
९.अर्जदार हा ६० वर्ष काली असेल तर वयाचा पुरावा,
१०. शाळा सोडल्याचा दाखला,
११.दारिद्र्यरेषेखालील अर्जदार हा असल्याबाबत विहीत प्रमाणपत्र.
१२. लाभार्थ्यांचा १०० रूपयांच्या शेतजमीन पसंतीबाबत स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र.
यासाठी पात्र शेतकऱ्यांनी संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात भेट द्यावी.
50 percent subsidy for the purchase of agriculture
50 percent subsidy for the purchase of agriculture