महाराष्ट्रातील या जिल्ह्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज सुरु | Aaple Sarkar Seva kendra
Aaple sarkar seva kendra |
आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज सुरु झाले आहेत. तर कोणत्या जिल्ह्यासाठी हे अर्ज सुरु झाले आहेत.तसेच कालावधी किती असेल अर्ज करण्यासाठी जागा किती आहेत, पात्रता काय आहे ,अटी व शर्ती काय आहेत,कागदपत्रे, इ. माहिती पाहणार आहोत.
माहिती व तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग महाराष्ट्र शासन शासन निर्णय क्र.ञ १७१६/प्र.क्र.५१७/३९ दि. १९/०१/२०१८ अन्वये राष्ट्रीय ई गव्हर्नन्स केंद्र शासनाच्या कृती कार्यक्रमानं अंतर्गत परभणी जिल्हयातील ग्रामीण भागात शासकीय, निमशासकीय सर्व सेवा पोहोचण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत परभणी जिल्ह्यातील एकूण २१८ ग्रामपंचायतीच्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यात येणार आहे.
कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज सुरु झाले आहेत.
अर्ज हे परभणी जिल्ह्यासाठी सुरु झाले आहेत .
जाहिरात तारीख-नोटीस : १५/०३/२०२२
अर्जदार लागणारी पात्रता.
●अर्जदाराने MS-CIT पूर्ण असणे आवश्यक आहे.
●अर्जदार हा १०, वी (SSC) पास असणे आवश्यक आहे.
एकूण जागा किती आहेत.
●तर २१८ जागा
आता अटी व शर्ती बघू.
● केवळ एकाच केंद्रासाठी अर्जदाराने अर्ज करावा.
●आपले सरकार सेवा केंद्रासाठी ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे. अर्जदार हा तेथीलच ठिकाणचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
●अर्जदार हा जेथे राहतो वा ज्या ठिकाणचा रहिवाशी आहे. अर्जदाराने त्याच ग्रामपंचायतीसाठी अर्ज करावा.इतर दुसऱ्या ग्रामपंचायतीसाठी अर्जदाराने अर्ज केल्यास अर्जदार अपात्र समजण्यात येईल.
●या आधी अर्जदाराच्या कुटुंबा मध्ये कुणालाही आपले सरकार सेवा केंद्र मंजूर नसावे.
●अर्जदार हा कुठलाच शासकीय कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी नसावा.
अर्जाचा नमुना बघण्यासाठी समोरील लिंक वरती क्लिक करा. https://parbhani.gov.in/notice/advertisement-for-aaple-sarkar-seva-kendra-distribution/
अर्ज करण्यासाठी लिंक – येथे क्लिक करा
खालील आवश्यक अर्ज करण्यासाठी कागदपत्रे.
●आधार कार्ड
●रहिवाशी प्रमाणपत्र ( ग्रामपंचायत)
● शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
● MS-CIT उत्तीर्ण प्रमाणपत्र
● शपथपत्र -यापूर्वी अर्जदाराच्या कुटुंबात आपले सरकार सेवा केंद्र नसलेबाबत आणि अर्जदार हा कुठेही शासकीय कर्मचारी,निमशासकीय,कंत्राटी कर्मचारी नसलेबाबत.
पात्रता व अपात्र यादी कधी घोषित केली जाणार.
पात्र अपात्र यादी हि ३१/०३/२०२२ रोजी जाहीर केली जाईल.